बेलापूर प्रतिनिधी:
बेलापुर गावाची वर्षभर साफ सफाई करणारे सफाई कर्मचारी तसेच गावात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असणारे लोह कारागीर बांधव तसेच शंभुक वसतीगृह श्रीरामपुर, श्री साई विठ्ठल अनाथाश्रम बेलापुर यांना दिपावली निमित्त समिंद्रा फौंडेशन यांच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की फौंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असुन शालेय मुलांना वह्या, पुस्तके,शालेय बॅग, कपडे त्याचबरोबर अनाथांना व गरजुंना कपडे, जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येते.अहमदनगर जिल्ह्यासह बीड, सांगली, सोलापुर येथेही फौंडेशनच्या वतीने मदतकार्य करण्यात आलेले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष व आदर्श राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते बबन तागड, पत्रकार देविदास देसाई ,अजिज शेख, शरद पुजारी, शफीक आतार, शिंदे, तोरणे आदिंसह बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी तथा घिसाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी बेलापुर ग्रामपंचायत २७ सफाई कर्मचारी तसेच लोह कारागीर बांधव, साई विठ्ठल अनाथ आश्रम, शंभुक वसतीगृह श्रीरामपुर आदि ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले.
*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

