shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकर ग्रामपंचायतीत कानडे - ससाणे गटाचा झेंडा

उपसरपंचपदी कानडे - ससाणे गटाचे सागर आहेर एक मताने विजयी, लोकनियुक्त सरपंचाचे निर्णायक मताने विजय

भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या भोकर ग्रामपंचायतीत काल झालेल्या चुरशीच्या उपसरपंच निवडीत कानडे - ससाणे गटाने बाजी मारत भोकर ग्रामपंचायतीवर आमदार लहु कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गटाचा झेंडा फडकवला आहे. येथे सत्ताधारी माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत काठावरच्या बहुमतात लोकनियुक्त सरपंचांच्या निर्णयाक मताने उपसरपंच पदावर ही शिक्कामोर्तब केल्याने येथे कानडे - ससाणे गटाचे सागर आहेर हे विजयी झाले.  
भोकर ग्रामपंचायत गेल्या तीन पंचवार्षीकपासून माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाच्या ताब्यात होती परंतू नुकत्याच झालेल्या चुरशीच्या लढतीत आमदार कानडे - ससाणे गटाच्या सौ. शितल प्रताप पटारे यांनी बाजी मारत या ग्रामपंचायतीत परीवर्तन घडवून आणले आहे. याच वेळी येथे असलेल्या १५ सदस्य संख्येपैकी कानडे - ससाणे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले होते तर मुरकूटे - ससाणे गटाला आठ जागा मिळाल्याने हा गट बहुमतात होता. परंतू शासनाच्या दि. ३० सप्टेबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार उपसरपंच निवडीत लोकनियुक्त सरपंच यांना मतदानाचा अधिकार आहे त्याच बरोबर समसमान मते झाल्यास निर्णायक मताचा अधिकार ही लोकनियुक्त सरपंच यांना मिळाला आहे.
त्यानुसार येथे कानडे - ससाणे यांचेकडे सरपंच व सात सदस्य मिळून आठ मते होती तर सात सदस्य असलेल्या कानडे - ससाणे गटाकडून उपसरपंच पदासाठी सागर दत्तात्रय आहेर यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली त्यांना मयुर दत्तात्रय काळे हे सुचक आहेत तर मुरकूटे - ससाणे गटाकडून गीरीष नारायण मते यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली त्यांना काळू संजय गायकवाड हे सुचक आहेत. याच दरम्यान मुरकूटे - ससाणे गटाने निवडणुक अधिकार्‍यांकडे लेखी अर्जाद्वारे गुप्त मतदानाची मागणी केली त्यास मंजूरी देत येथे गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले.
त्यात मुरकूटे - ससाणे गटाचे माया राक्षे, हिराबाई खंडागळे, सिमा विधाटे, गीरीष मते, संजीवनी काळे, मिना आबुज, विजय अमोलीक व काळू गायकवाड हे आठ सदस्य तर कानडे - ससाणे गटाचे मयुर काळे, आप्पासाहेब जाधव, संगीता अभंग, सागर आहेर, संदिप गांधले, छाया आहेर, ज्योती डूकरे या सात सदस्यांसह व लोकनियुक्त सरपंच शितल पटारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. नव्याने विजयी झालेल्या निष्ठावान सदस्यांनी दोन्ही गटांकडून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचीत सदस्यात कुठलीच फुट न पडल्याने आहेर व मते यांना समसमान म्हणजेच अनुक्रमे आठ, आठ मते पडल्याने शासनाच्या निर्णयानुसार लोकनियुक्त सरपंच शितल पटारे यांनी आपले निर्णयाक मत सागर आहेर यांना दिल्याने येथे कानडे - ससाणे गटाचे सागर आहेर हे उपसरपंच म्हणून एक मताने विजयी झाले. एकंदरीत येथे लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच दोघेही कानडे - ससाणे गटाचे झाल्याने या ग्रामपंचायतीत परीर्वतन होवून येथे कानडे - ससाणे गटाचा झेंडा फडकल्याने व ही ग्रामपंचायत कानडे - ससाणे गटाच्या ताब्यात आल्याने येथे या उपसरपंच निवडीने पॅनलच्या नावाप्रमाणे खर्‍या अर्थाने ग्रामपंचायतीत परीवर्तन झाले.
यावेळी अशोक कारखाणन्याचे माजी संचालक खंडेराव पटारे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, भिकाजी पोखरकर, रामदास शिंदे, गणेश कांबळे, मच्छींद्र पटारे, भाऊसाहेब पटारे, दिलीप पटारे, राहुल अभंग, सेनेचे दत्तात्रय पटारे, डॉ. सागर अभंग, सम्राट माळवदे, निखील कांबळे, सचीन पोखरकर, प्रताप पटारे, राजेंद्र विधाटे, निलेश विधाटे, प्रतिक कांबळे, रावसाहेब लोखंडे, अभिषेक शिंदे, नारायण पटारे, डी.एस.पटारे, भाऊसाहेब लोखंडे, मारूती शिंदे, आण्णासाहेब पटारे, बाळासाहेब बेरड, पोपट पटारे, याकोब अमोलीक, भास्कर आहेर, बाळासाहेब पटारे, दत्तात्रय काळे, माणीक पटारे, संदिप मते, मोहन पांढरे, सतीष पवार, वसंत शिंदे, प्रकाश विधाटे, वेणुनाथ डूकरे, लहानभाऊ विधाटे, काळू डूकरे, शांताराम पवार आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थीत होता.
या निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच शितल पटारे यांनी काम पाहीले, त्यांना ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी सहकार्य केले तर निवडणुक निरीक्षण अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी काम पाहीले. तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो.काँ.संतोष कराळे व पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

भोकर ग्रामपंचयातीत उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना माजी आमदार लहु कानडे व करण ससाणे गटाचे नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ दिसत आहेत. (छाया-भानुदास बेरड,भोकर)

*चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close