shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेलचे गज कापून कुख्यात चार आरोपी पोलिसांच्या हातावर तूर्ऱ्या देत झाले 'मिस्टर इंडिया'..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३

जेलचे गज कापून कुख्यात चार आरोपी पोलिसांच्या हातावर तूर्ऱ्या देत झाले 'मिस्टर इंडिया'..!!


संगमनेर : संगमनेर शहरातील जेलचे गज कापून पुन्हा बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली असून बुधवारी दि.८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या साडेचार पाचच्या सुमारास घडली आहे.यात लैंगिक अत्याचारामधील आरोपी रोशन थापा ददेल,अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
संगमनेर शहर जेलचे गज कापून कुख्यात चार आरोपी पोलिसांच्या हातावर तूर्ऱ्या देत झाले 'मिस्टर इंडिया'..!!

       सुरक्षेसाठी देण्यात असलेले पोलीस झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास आरोपींनी हा डाव साधला.आरोपींनी गज कापून पलायन केले असून यामुळे संगमनेर शहर हादरून गेले आहे. पळून गेलेले आरोपी हे कुख्यात आरोपी असून या आरोपींनी प्लॅनिंग करून पळून जाण्याचा डाव साधला असल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे कारण या ठिकाणी त्यांच्यासोबत इतर आरोपी असताना आणि जेलमध्ये अधिकारी कर्मचारी असताना गज कापून पलायन करणे म्हणजे सोपी गोष्ट नसूनही ही गोष्ट या आरोपींनी साध्य केली म्हणजेच कुठेतरी मोठे प्लॅनिंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आता विविध ठिकाणी पथके पाठवले असून आरोपी लवकरच पुन्हा जेरबंद होतील अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close