shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिर्डीतील संघर्षयोद्धा सेवक कै.संभाजी लक्ष्मण अवचर अनंतात विलीन..!


शिर्डी येथील प्रगतशील व्यवसायिक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्येष्ठ कार्येकर्ते कै.संभाजी लक्ष्मण अवचर यांचे नुकतेच दुखद निधन झाले आहे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयवंसेवक संघाचे सेवक  म्हणून राहिलेल्या संभाजी अवचर यांनी शिर्डी शहरात तरुणांची मोठी चळवळ उभारुन शिर्डी राञ शाखेची यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. अनेक वर्ष शाखेत शारीरिक शिक्षक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले तर राणा प्रताप शिव संघटना सदस्य , बजरंग दल जिल्हा सदस्य , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सदस्य,भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराध्यक्ष, विश्व हिंदू परिषद संघटनेत तालुक्याची यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. आळंदी येथील हिंदू संमेलनात त्यांनी सक्रिय राहून जबाबदारी पार पाडली. तर कार सेवेसाठी दोन वेळेस सायकल सहल काढून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. 


तरुणांमध्ये अभ्यासू वृत्ती व शिस्तबद्ध जीवनशैली वाढविण्यासाठी डोंगर माथ्यावरील साहस सहल तसेच शिर्डी ते अजंठा , हरिश्चंद्रगड , रायगड , प्रतापगड यासह इतर ठिकाणी सहली काढून तरुणांना मार्गदर्शन त्यांनी केले.शिर्डी शाखेची मंडल प्रमुख म्हणून सलग दहा गावांची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.नगर जिल्हा प्रचारक म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


त्यांच्या साध्या राहणीमान व उंच विचारसरणीने त्यांचा शिर्डीसह राज्यभर मोठा मिञ परिवार आहे.शिर्डीतील सामाजिक कार्यात पुढाकार घेत त्यांनी साईबाबांच्या शिकवणीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. शिर्डी शहरातील  फुल प्रसाद  व्यवसायातही  त्यांचे मोठे नावलौकिक असुन दि.९/११/२०२३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि अवचर परिवारासह नातेवाईक व मिञ परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला. शिर्डीतील एक  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक लढवय्या स्वयंसेवक गेल्याने शिर्डीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असुन.कै संभाजी लक्ष्मण अवचर यांच्या पश्चात ग.भा. रंगुबाई संभाजी अवचर , पन्नी 
शिवाजी लक्ष्मण अवचर , भाऊ
तान्हाजी लक्ष्मण अवचर ,भाऊ
रंभाजी लक्ष्मण अवचर , भाऊ
हनमंत लक्ष्मण अवचर , भाऊ 
सौ.जिजाबाई सुरेश कदम , बहिण कु.कोमल संभाजी अवचर , मुलगी गणेश संभाजी अवचर , मुलगा व पुतणे असा परिवार असुन त्यांचा दशक्रियाविधी कार्यक्रम रविवार दि.१९/११/२०२३ रोजी सकाळी ८ वा. श्रीकृष्ण मंदिर नांदुर्खी पाट ता.राहाता येथे होणार आहे.
कै.संभाजी लक्ष्मण अवचर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

*शब्दांकन - राजेंद्र बनकर शिर्डी*
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close