shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी आ.मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची नगर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीत सत्ता


श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारत राष्ट्र समिती पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सात ग्रामपंचायतीत यश मिळवून आपले खाते उघडले आहे.

            नगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहिर झाले आहेत. या निकालानुसार श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव, उक्कलगाव, निमगाव खैरी, भैरवनाथ नगर, खिर्डी, दिघी व नेवासा तालुक्यातील पाचेगाव या सात ग्रामपंचायतीत भारत राष्ट्र समितीचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये बी.आर.एस. पक्षाची सत्ता आली आहे.

            भारत राष्ट्र समितीचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.  प्रतिभा जितेंद्र गोलवड (उंदिरगाव), कु.रविना तुळशीदास शिंदे (उक्कलगाव), दत्तात्रय वेणुनाथ झुराळे (निमगाव खैरी), दिपाली प्रविण फरगडे (भैरवनाथ नगर), सुनिता बाबासाहेब कांबळे (खिर्डी), अनिता संदीप जाधव (दिघी), वामन जालिंदर तुवर (पाचेगाव). तसेच सदस्य पदासाठी निवडून आलेले सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे: उंदिरगाव (१०), उक्कलगाव (७), निमगावखैरी (३), भैरवनाथनगर (१३), खिर्डी (६), दिघी (४), पाचेगाव (८).
          भारत राष्ट्र समितीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे माजी आ.भानुदास मुरकुटे, बी.आर.एस. चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, शहराध्यक्ष नाना पाटील, जिल्हा समन्वयक मयुर पटारे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, सिद्धार्थ मुरकुटे, सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी अभिनंदन केले आहे.

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close