उंदिरगाव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने अशोक कारखान्याचे संचालक विरेश गलांडे यांच्या संकल्पनेतून व उंदिरगाव युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी युवकांचा गौरव समारंभ सरपंच सौ.प्रतिभाताई गोलवड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
उंदिरगाव येथील अनेक युवक, युवती विविध क्षेञात कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे गावाचा नावलौकिक वाढला आहे. दिवाळीसाठी हे युवक गावी आले असता त्यांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक वीरेश गलांडे, भारतीय जनता पक्षाचे भीमभाऊ बांद्रे, सोपानराव नाईक, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी युवकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सरोदे, शंकरराव आढाव, दादासाहेब खर्डे, विजय ताके, रमेश गायके, सुभाष पंडित, राजेंद्र गिऱ्हे, बाळासाहेब निपुंगे, सुधीर ताके, योगेश सरोदे, प्रमोद भालदंड, शांताराम गायकवाड, युवराज नाईक, संदीप ताके, अशोक बांद्रे, बबनराव नाईक, रामचंद्र आव्हाड, रामेश्वर वांद्रे, लक्ष्मण रगडे, अब्बास शेख, भीमराज बागुल, नितीन गलांडे, सुनील आव्हाड, सचिन आव्हाड, हाजीभाई शेख, पांडुरंग राऊत, बाळासाहेब राऊत, सचिन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, दीपक बोधक, सोमनाथ वाकचौरे, विजय सोमवंशी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

