shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ओबीसी सेल विभागाच्या कार्याध्यक्षपदी गोतंडी चे तात्याराम बनसोडे यांची नियुक्ती.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ओबीसी सेल विभागाच्या कार्याध्यक्षपदी गोतंडीचे तात्याराम  बनसोडे यांची नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजन  राष्ट्रीय कार्यअध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल विभागाच्या इंदापूर तालुका कार्यअध्यक्षपदी गोतंडी गावचे तात्याराम अर्जुन बनसोडे यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची नोंद घेऊन पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली .
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आपणास सर्वांच्या सहकार्याने करावयाची आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे ,ओबीसी सेलचे राज राजपूरकर ,आमदार अशोक पवार ,पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, देवदत्त निकम, इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी करावी अशा विषयाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
close