इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया सेल इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी रणगावचे अविनाश अंबुडकर यांची नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजन राष्ट्रीय कार्यअध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया संघटने मध्ये इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडिया सेल विभागाच्या इंदापूर तालुका कार्यअध्यक्षपदी रणगावचे अविनाश प्रमोद अंबुडकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष गुलजार उर्फ पैगंबर शेख
यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली .
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद केले आहे की, शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटन मजबुती ने उभे कराल अशी अपेक्षा आहे. अशा आशयाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

