श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर परीसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे संकल्पेनुसार येथील वृद्ध माता भगीनी यांचेसाठी दिपावली, पाडवा - भाऊबीज सण उत्सव या निमित्ताने साडी तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वृद्धाश्रमातील माता भगिनी यांनी पोलिस अधिकारी हर्षवर्धन गवळी तसेच पोलिस उपनिरीक्षक सोळुंखे,पो.कॉ. संतोष परदेशी,पो. ना. मच्छिन्द्र शेलार,पो. ना.रघुवीर कारखीले, पो. कॉं. राहुल नरवडे, गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, पोलिस मित्र, गणेश गायकवाड, यांचे औक्षण करण्यात आले. तसेच श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन यांचे वतीने वृद्धाश्रमातील माता - भगिनींना वस्त्रदान तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री. सुभाष वांघुडे, सौ.कल्पना वाघुंडे,श्री.खिलारी, श्री.जेजुरकर, शुभम नामेकर आदी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्नशिल होते, मिष्ठाण भोजनाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली, उपस्थित सर्वांचे पोलिस पो.कॉ. संतोष परदेशी, पो. ना. मच्छिन्द्र शेलार यांनी आभार मानले.
वृत्तविशेष सहाय्य
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

