shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मेजर नंदकुमार सैंदोरे यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार संपन्न..!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले राहुरी तालुक्यातील मांजरी गावातील मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांचा त्यांच्या देशसेवेबद्दल आणि कृषी कार्याबद्दल त्यांची पत्नी सौ. पल्लवी सैंदोरे यांच्यासह सत्कार करण्यात आला.प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, खजिनदार सौ.मंदाकिनी उपाध्ये, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, सचिव सौ.आरती उपाध्ये यांनी सन्मान करून त्यांना भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कु.आराध्या सैंदोरे, कु. धनश्री सैंदोरे,श्रीराम सैंदोरे, निर्मिक उपाध्ये, ग्रन्था उपाध्ये,अर्णव माळी उपस्थित होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी नंदकुमार सैंदोरे यांच्या भारतीय सीमेवरील कार्य हे देशवासियांना अभिमानास्पद असून त्यांनी जम्मू काश्मीर, आसाम, मध्यप्रदेश इत्यादी भागात केलेले कार्य आणि सौ. पल्लवी उपाध्ये यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, हडपसर येथे केलेल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या  साहित्यवाचन, लेखनाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 


मेजर नंदकुमार सैंदोरे यांनी आपल्या विविध भागातील थरारक आणि नाविण्यपूर्ण आठवणी सांगून वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले. गणेशानंद यांनी आभार मानले.


*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close