[ संस्थापक प्रशांत कोते,अध्यक्ष रविंद्र शेळके यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने साईभक्तांची सेवा घडत आहे - पो.नि - पाटील ]
राजेंद्र बनकर / शिर्डी
शिर्डीतील साईआश्रम धर्मशाळा येथील ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना , जनेश्वर प्रतिष्ठाण शिर्डी शहर तसेच जीप चालक मालक संघटनेच्या वतीने दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम शिर्डी वाहतुक नियंत्रण शाखेचे पो.निरिक्षक गुलाबराव पाटील संस्थापक प्रशांत कोते , अध्यक्ष रविंद्र शेळके आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे.
याप्रसंगी शंकर आवारे , किरण कोते , विशाल दहिवाळ , संतोष जेजुरकर , नसीर पठाण , बद्रीनाथ लोखंडे संतोष आवारे , विजय मते , दीपक आवारे , विकी लुटे , रवी शिवरकर , सागर शिंदे , रमेश शेळके , विजय गुडघे , गणेश कुटे आदीसह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
साईआश्रम येथील ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेचे चालक मालक हे साईभक्तांची उत्कृष्ट सेवा करत असुन या संघटनेची एकही तक्रार नसल्याचे सांगत
संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी चालकांना योग्य मार्गदर्शन करुन साईभक्तांची सेवा करत असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी पो.नि.गुलाबराव पाटील यांनी संघटनेचे कौतुक केले त्यामुळे सर्व सदस्यांना उर्जा मिळाली असुन सन २०१३ पासुन या तिन्ही संघटना शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची प्रामाणिक सेवा करत असुन वेळप्रसंगी साईभक्तांच्या विविध अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जात असल्याचे प्रशांत कोते यांनी सांगितले.
तर अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी संघटनेच्या माध्यमातून गणेश उत्सव , कोजागिरी पौर्णिमा , रंगपंचमी तसेच शिर्डीतील श्री साईबाबांचे उत्सव साजरे केले जात असुन या उत्सवात साईभक्तांना सहभागी केले जात असल्याचे सांगत पो.नि.गुलाबराव पाटील यांनी संघटनेचे केलेले कौतुक हे आणखी प्रेरणा देणारे ठरेल असे स्पष्ट केले. तर साईभक्ताचे अनावधानाने अनेकदा पाकिटे अथवा पर्स वाहनांमध्ये राहून जातात अशावेळी प्रामाणिकपणे त्या साईभक्तांना ते पुन्हा देऊन आपला प्रामाणिकपणा जपणारी ही संघटना असल्याचे बद्रीनाथ लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी आकाश नवसारे , प्रमोद कदम , विजय जेजुरकर , दीपक वाघ , भाऊसाहेब जाधव , साईराम सोळसे , रवी जगताप , मोबीन शेख , अमोल वाडगे , दीपक मगर , राजेंद्र निकम , बाळासाहेब शिंदे , अजय पगार , संतोष धुळे , सचिन निकम , सचिन नागरे , प्रवीण देशमुख , संदीप शेजुळ , आदीसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

