अशोकनगर प्रतिनिधी:
अशोक सहकारी साखर कामगार पतपेढीने दीपावली सणानिमित्त सभासदांच्या बँक खाती रु.३० लाख वर्ग केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दोंड यांनी दिली.
याविषयी माहिती देताना श्री.दोंड यांनी सांगितले की, माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेचे एकूण ५३९ सभासदांना ९ टक्के प्रमाणे डिव्हिडंड, कर्मचारी बोनस व एक महिन्याचा पगार असे रु. ३० लाख वर्ग करणेत आले आहे. अशोक कामगार पतपेढीने दीपावली सणापूर्वीचे सभासद कामगारांना लाभांश रकमेचे वाटप करणेसाठी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे व संचालक मंडळास पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड,व्हा.चेअरमन संतोष जाधव,सचिव दीपक बडजाते व संचालक मंडळाच्या सदस्यांनी धन्यवाद दिले आहेत.
*पत्रकार इम्रान एस.शेख- श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

