shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरपंच दिलीप त्रिभुवन यांची भाजप अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती


*बी.आर.चेडे - शिरसगांव
हरिगांव ग्रामपंचायत येथील प्रभारी सरपंच दिलीप त्रिभुवन यांची ना.राधाकृष्ण विखे पा.व जिल्हा सरचिटणीस नितीनराव  दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या उत्तर अहमदनगर जिल्हा अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तशा निवडीचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अ.नगर विठ्ठलराव लंघे यांनी दिले आहे.

या निवडीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून विविध विकास योजना व गोरगरीब यांना जे भरीव योगदान देत आहेत व देशाला त्यांचेशिवाय पर्याय नाही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मला पक्षात सेवा करण्याची संधी दिली.त्या माध्यमातून हरिगांव परिसरात विकास कामे करण्यास सहकार्य मिळेल असे ते म्हणाले.
त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल दीपक आण्णा पटारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश भालेराव, अतुल भालेराव,सचिन गांगुर्डे,कोमल जाधव,अंकुश सातुरे,आदीनी अभिनंदन केले आहे.


*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close