shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उंबरगाव सोसायटीच्या चेअरमपदी रविंद्र झरेकर, तर व्हा.चेअरमनपदी प्रा.अशोक बर्गे बिनविरोध


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, खा.सदाशिव लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे अधिपत्याखालील उंबरगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रविंद्र कोंडीराम झरेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रा.अशोक पंढरीनाथ बर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
श्रीरामपूर सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपीक आर.एस.जोशी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन पदासाठी रविंद्र कोंडीराम झरेकर यांच्या नावाची सूचना बाळासाहेब साहेबराव काळे यांनी मांडली, त्यास दिलीप बाबुराव कांडेकर यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमन पदासाठी प्रा.अशोक पंढरीनाथ बर्गे यांच्या नावाची सूचना विलास कुंडलीक राऊत यांनी मांडली, त्यास सचिन बाबासाहेब काळे यांनी अनुमोदन दिले. सदर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.जोशी यांनी जाहीर केले.

या निवडी प्रसंगी कारेगाव भाग कंपनीचे संचालक सचिन काळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय वारुळे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, अशोक कारखान्याचे गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, माजी चेअरमन विलास राऊत, तंटामुक्ती उपाध्यक्ष गोकुळ कोळसे, पढेगाव तंटामुक्ती अध्यक्ष राहुल बनकर, संस्थेचे संचालक सचिन कोळसे, दिलीप कांडेकर, बापूसाहेब कोळसे, गणपतराव कोळसे, निलेश बनकर, दिगंबर राऊत, बाळासाहेब ओहोळ, किशोर कांडेकर, संस्थेचे सचिव चंद्रकांत अभंग, सहसचिव चांगदेव गुंजाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

नूतन चेअरमन रविंद्र झरेकर व व्हा.चेअरमन प्रा.अशोक बर्गे यांचे अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, खा.सदाशिव लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, लोकसेवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी अभिनंदन केले आहे.

*पत्रकार इम्रान एस.शेख- श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close