धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी
सकल धनगर समाज इंदापूर तालुका यांच्यावतीने उद्या इंदापूर बंदची हाक व पुणे सोलापूर सरडेवाडी टोलनाका येथे रस्ता रोकोचे दिले तहसीलदार व इंदापूर पोलीस स्टेशन यांना निवेदन पत्र.
इंदापूर प्रतिनिधि: उद्या धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाज इंदापूर तालुका यांच्यावतीने दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी इंदापूर बंदची हाक देऊन पुणे सोलापूर हायवे वर सरडेवाडी टोल नाका येथे सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन पत्र आज दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कडे निवेदन पत्र देऊन कळविण्यात आले आहे.
सदर देण्यात आलेल्या निवेदन पत्रात नमूद केले आहे की,धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी इंदापूर बंद करणेबाबत विषय असून वरील विषयास अनुसरुन बारामती येथे गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ पासून धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे प्रतिनिधी चंद्रकांत वाघमोडे हे आमरण उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे. समाजामध्ये या विषयीची भावना तीव्र होत चाललेली आहे. उपोषणकर्त्याच्या मागणीला बळ देण्यासाठी सनदशिर मार्गाने शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी इंदापूर बदंची हाक समाजाच्या वतीने देत आहोत. सदरील बंद हा शांततेच्या मार्गाने करीत आहे.
तसेच दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे-सोलापूर हायवेवर सरडेवाडी टोलनाका येथे सकाळी १० वा. रास्ता रोको अंदोलन करण्यात येईल. तरी प्रशासनाकडून सर्व प्रकारची योग्य मदत मिळत रहावी यासाठी आपणास नम्र विनंती.सकल धनगर समाज, इंदापूर तालुका आशा आशयाचे सहीसह निवेदन पत्र देण्यात आले आहे.
सदर निवेदन पत्र तहसीलदार श्रीकांत पाटील यांना तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देताना इंदापूर तालुक्यातील सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

