shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला- करण ससाणे..


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
आद्य क्रांतिकारक व आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. 


श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की ब्रिटिश सरकारचे शोषण व दडपशाहीचे धोरण शिगेला पोचलेले असताना, ब्रिटिश व्यवस्थेतील जमीनदार, सावकार आदिवासींचे प्रचंड शोषण करत, अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांचे प्रबोधन करत त्यांच्यात नवचेतना निर्माण केली. बिरसा मुंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी चळवळींना वाव मिळाला. ब्रिटिशांच्या शोषणातून आदिवासींच्या मुक्तीसाठी बिरसा मुंडा यांनी महत्त्वाचे योगदान दिले . यावेळी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या जयंती प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, रावसाहेब आल्हाट, प्रताप देवरे सर, अशोकराव जगधने, मंगलसिंग साळुंखे, सुरेश ठुबे, रितेश एडके, भगवान जाधव, डॉ राजेंद्र लोंढे, बाबा वायदंडे, सनी मंडलिक, सुनील साबळे, गणेश काते, नवाज जहागीरदार, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड,संजय गोसावी, गोपाल भोसले, विशाल साळवे, आकाश जावळे, सागर दुपाटी, तीर्थराज नवले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close