shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कला, साहित्य व सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी सौ.स्वाती नागपुरे यांची निवड.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कला, साहित्य व सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी सौ.स्वाती  नागपुरे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधि: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा
प्रदिप गारटकर अध्यक्ष यांच्यावतीने सौ.स्वाती आशानंद नागपुरे रा. इंदापूर ता. इंदापूर जि.पुणे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कला साहित्य व सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
सदर निवडीचे पत्र माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे कार्याध्यक्ष अतुल झगडे युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर निवड पत्रात नमूद केले आहे की,इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी कला साहित्य व सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे, याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन....!!!!
राज्याचे उपमुख्यमंत्री ना .अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे , सहकारमंत्री दिलीप वळसेपाटील राज्यमंत्री आमदार  दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार- विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, असा मला विश्वास आहे.
पुनश्च आपले मनकपुर्वक अभिनंदन.....!!!!! आशा आशियाचे नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
close