shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हामा पाटील यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती.

हामा  पाटील यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पदी  नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधि: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यावतीने हामा शिवाजी पाटील रा. कौठळी ता. इंदापूर जि. पुणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली 
सदर निवेदन पत्र पुणे जिल्हा (अजित पवार गट)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
सदर निवेदन पत्रात नमूद केले आहे की,
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे , सहकारमंत्री  दिलीप वळसेपाटील ,राज्यमंत्री आमदार  दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार- विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, असा मला विश्वास आहे.आपले मनकपुर्वक अभिनंदन.....!!!! अशा आशियाचे नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
close