श्रीरामपूर प्रतिनिधी:
आमचे नेते ना. छगणराव भुजबळ यांनी नेहमीच मराठा समाजाला थोरल्या भावाचा सन्मान दिलेला आहे, आज ही ओबीसी समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध नाही, सरकारने त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता कीती ही टक्के आरक्षण द्या, फक्त ओबीसीमध्ये समावेश करून उर्वरीत ओबीसी समाजावर अन्याय करू नका हि आमची प्रमुख मागणी आहे, त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे शुक्रवारच्या एल्गार सभेला श्रीरामपूर तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसीं नी सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसींनी केले.
श्रीरामपूरआरक्षण मुद्द्यावरुन ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजामध्ये सत्तेवर बसविण्याची व सत्तेवरुन पायउतार करण्याची ताकद आहे हे कोणी विसरु नये, जर ओबीसी समाजावर अन्याय होणार असेल तर समाज गप्प बसणार नाही तर आक्रमक होईल असा इशारा सरकारला श्रीरामपूर ओबीसी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.
अंबड जि. जालना येथे शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर' च्या आरक्षण बचाव एल्गार सभेचे' आयोजन करण्यात आले आहे या सभेस श्रीरामपूर तालुक्यातील हजारो ओबीसी समाज बांधव जात आहेत.
त्या नियोजनासाठी श्रीरामपूर शहरातील माळी बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदर इशारा देण्यात आला आहे. यावेळी बैठकीत विविध समाजातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने आरक्षणा संदर्भात आपली भुमिका मांडली.ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये. यासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी बैठकीमध्ये करण्यात आला.मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार पुर्णपणे ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला हवे. आरक्षणाच्या मुद्द्यावर श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज एकवटला आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाज एकवटला असुन पुढील काळात ओबीसींची ताकद दाखवून देण्यात येईल. अगामी काळात केवळ सामाजिक व शैक्षणिकच नव्हे तर राजकीय सत्तेतही ओबीसींचा सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी अनेकांनी बोलून दाखविला. राज्यभरात वारंवार ओबीसी समाजाच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांचा अपमान म्हणजे सकल ओबीसी समाजाचा अपमान आहे हे कोणी विसरु नये. आपल्या हक्काच आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी हा लढा आहे ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या व झगडणाऱ्या नेतृत्वालाच अगामी काळात ओबीसी समाज पाठबळ देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे अंबड तालुका व जालना जिल्ह्यातील सकल ओबीसी,भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्यांक समाज यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आरक्षण बचाव एल्गार' सभेला श्रीरामपूर तालुक्यातुन हजारो समाजबांधवांची ऊपस्थिती लावण्याचा निर्धार सकल ओबीसी समाज यांच्यावतीने करण्यात आला आहे या बैठकीस सुभाषराव गायकवाड, चंद्रकांत झुरंगे, जालिंदर कु-हे,सुरेंद्र गिरमे,विवेक गिरमे,जयंत लोखंडे,राजेंद्र विधाटे,संचित गिरमे,महेश दारुंटे,दिपक दळवी,निलेश जाधव,प्रा.सतिष म्हसे,नितिन लांडगे,भगिरथ म्हसे,हरि कु-हे,राजेंद्र सातभाई,चंद्रकांत शेवाळे,दादा मेहेत्रे,प्रकाश मेहेत्रे,बी.एम.पुजारी,संजय गवते,अभिजीत बारस्कर,सतिश होले,कैलास सिन्नरकर,सुरेश सोमवंशी,बाबुराव सिन्नरकर, विकास लांडगे, भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब मेहेत्रे यांच्यासह श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागातील विविध ओबीसी समाजातील समाज बांधव व विविध ओबीसी समाज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - *9561174111*

