देहरे (नगर): नगर- शिर्डी रस्त्यावरील नगर तालुक्यातील देहरे येथे परमहंस सद्गुरू आनंदमाईंचे जागृत देवस्थान आहे..! या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भक्त-भाविकांची दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. सद्गुरू आनंदमाईंच्या ५३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी सभामंडपासाठी येथील परमहंस सद्गुरू आनंदमाई संस्थानला १५ लक्ष व ९ लक्ष असा निधी उपलब्ध करून दिला आहे. याचा पाठपुरावा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून देहरे विकास सोसायटीचे सदस्य मेघनाथ धनवटे यांनी केल्यानंतर सदर निधी मिळाला आहे. परमहंस सद्गुरू आनंदमाईंच्या ५३व्या पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून खासदार सुजयदादा विखे पाटील व अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सप्ताह सोहळा कार्यक्रमास भेट देऊन सदर सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन केले. यावेळी सरपंच सौ. भगत, संजय शिंदे, संजय लांडगे,मेजर काळे,बबन करंडे, मेघनाथ धनवटे, कल्याणी धनवटे व पंचक्रोशीतील भाविक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

