shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शांत, संयमी आणि डॅशिंग नाशिक चे नवनिर्वाचित पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे सत्कार

विशेष प्रतिनिधी: दिपक कदम
नाशिक: अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतिने नाशिक चे नवनिर्वाचित पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांचा सत्कार समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली करण्यात आला.

 या प्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राहुल डंबाळे व प्रदेश अध्यक्ष सुवर्णाताई डंबाळे यांनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख व परिचय करून दीला. या वेळी दोन तास संदीप कर्णिक यांनी वेळ देवून नाशिक ची वाढती गुन्हेगारी व चैनस्कॅनिग, खंडणी, खुन, अमली पदार्थाची विक्री, महीला युवतींची होणारी छेडछाड, व महीला दक्षता समिती व कौटुंबिक हिंसाचार आदी विषयांवर मार्गदर्शनपर साधक -बाधक चर्चा करुन स्नेह परिचय करून देण्यात आला.
 या प्रसंगी शहराध्यक्ष सचिन बागुल, मनपा प्रमुख विकी साळवे, संदीप साबळे, रफीक सैयद सर, वैशालीताई जाधव, वर्षा बोरसे, राजनंदीनी आहीरे, संगिता पवार, वृषाली शेलार, विशाल वाघमारे, स्वप्नील केदारे, निर्मला गायकवाड, संगिता गायकवाड, रोहीत गायकवाड आदींनी शाल व गुलाबपुष्प देवुन श्री.कर्णिक यांचा सत्कार केला व चर्चेत सहभाग घेतला.  
या वेळी रविंद्रदादा जाधव यांनी मनोगतातुन शाब्दिक शुभेच्छा दिल्या तर कर्णिक साहेब यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य कामात कायदेशीर सहकार्य करीन असे आश्वासन दिले.


*पत्रकार राजु मिर्जा
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
( ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close