shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबाजोगाईतील आणखी 38 अंतर्गत रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी मंजूर

आ. नमिता मुंदडाच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाई शहरात विकासकामांचा धडाका..


प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज मतदार संघाच्या विकासाभिमुख आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंबाजोगाई शहरात विकासाचा महापुर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गतवर्षी शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी दिडशे कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शहरातील अन्य 38 रस्त्यांसाठी आणखी दिडशे कोटी रूपयांच्या निधीला राज्य शासनाने सोमवारी (दि.04) मंजुरी दिली. यामुळे लवकरच अंबाजोगाईतील जवळपास सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असून पुढील अनेक वर्षे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

 
शांत आणि सुसंस्कृत, शैक्षणिक वातावरणामुळे अंबाजोगाईत राहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक प्राधान्य देतात. त्यामुळे नवनवीन वसाहती तयार होत असून शहर वेगाने वाढत आहे, त्यासोबतच लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन आ. मुंदडा यांनी शहरासाठीच्या विकासकामांकडे विशेष लक्ष दिले आहे. रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन शहरात सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून मागील वर्षी शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 105 कोटी रूपये तर मुख्य रस्त्यासाठी 44 कोटी रूपये असा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर आ.मुंदडा  यांनी शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्त्यांचे रूपडे पालटण्यासाठी 
प्रयत्न सुरूच ठेवले. आ. मुंदडा यांचे कर्तृत्व लक्षात घेत राज्य सरकारने मुक्त हस्त देत सोमवारी अंबाजोगाई शहरातील एकुण 38 रस्त्यांसाठी 150 कोटी 34 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. त्यामुळे लवकरच अंबाजोगाईकरांची खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. अंबाजोगाईच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी विशेष आभार मानले आहेत. या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आ. नमिता मुंदडा यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत त्यांना वारंवार सहकार्य करून पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. 

*अन्य विकासकामांच्या निधीसाठी प्रयत्न सुरू*

अंबाजोगाई शहरातील नागरिकांना शब्द दिल्याप्रमाणे विकासकामांच्या दुसर्‍या टप्प्यात 150 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भविष्यात अन्य विकासकामांसाठी भरघोस  निधी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

*आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा मतदार संघ*
close