राधिका माध्यमिक विद्यालयास निर्भया पथकाने दिली भेट.
इंदापूर प्रतिनिधी: राधिका माध्यमिक विद्यालयास बारामती उपविभागाच्या निर्भया पथकाने भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेविषयीच्या अडचणी वर चर्चा केली व भविष्यामध्ये काही अडचणी आल्यास निर्भया पथक त्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. सदर पथका अंतर्गत दौंड पोलीस स्टेशन चे धगाटे, वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या सौ जाधव मॅडम तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पाटील यांनी विद्यालय भेट दिली.

