shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मतदारसंघातील गावठाणातील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आ. नमिता मुंदडा यांनी आणला 80 कोटींचा निधी..!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-                            केज मतदारसंघातील गावठाणासाठी सुधारित वितरण क्षेत्र ( आरडिएस एस) योजनेअंतर्गत अखंडपणे विद्युत पुरवठा मिळवणे केज मतदारसंघात शक्य होणार आहे. त्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामासाठी आरडिएस एस योजनेतून 80 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून गावठाण फिडर आणि शेती फिडर वेगवेगळे केले जाणार आसल्याने गावठाण फिडर वर चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे. तसेच जिथे नियमानुसार लोड आहे आवश्यकता आहे तिथे 100 केव्ही रोहिञ बसवण्यात येणार आहेत. 


अनेक ठिकाणी जुने 11केव्ही 33केव्ही एल. टी. कंडक्टरची साईज कमी पडत आहे . कंडक्टरचे तुकडे पडत आहेत त्या ठिकाणी उच्च दर्जाचे कंडक्टर बसवण्यात येणार आहेत. नवीन 11केव्ही 33केव्ही लिंक लाइनचे कामे करण्यात येणार आहेत. इन्सुलेटर, फिडर नुतनीकरण, दोन खांबात जास्त अंतर असेल तर तर्नवीन खांब उभारणे , नादुरुस्त खांब, 11केव्ही 33केव्ही बदलणे आदी आवश्यक कामे केली जाणार आहेत. तसेच 33केव्ही सबस्टेशन , 11केव्ही फिडर वेगवेगळे केले जाणार आसून ज्या गावातील रोहिञ वारंवार फेल होत आहेत तिथे एबी केबल टाकण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली असून कार्यारंभ आदेश होऊन प्रत्येक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ,उर्जामंञी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीड जिल्हाच्या लोकप्रिय खासदार प्रीतम ताई मुंडे यांचे आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी आभार मानले आहेत.                              


केज मतदारसंघातील गावासाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंञी देवेंद्र फडणवीस यांनी आरडिएस एस योजनेतून तब्बल 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून होणाऱ्या  कामातून ग्रामीण भागातील गावठाण फिडर वर येणारा लोड कमी होऊन उच्च दाबाने विद्युत पुरवठा  चोवीस तास सुरळीत चालू राहणार आहे.  या कामामुळे केज मतदारसंघातील जनतेकडून उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विषेश आभार मानले जात आहेत. व ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
close