चेतना फाउंडेशनला 'सदिच्छा 'अपंग पुनर्वसन केंद्राची भेट
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी ,चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज सडेवाडी येथे 'सदिच्छा' अपंग पुनर्वसन केंद्राची भेट
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील चेतना फाउंडेशनला शनिवार (ता. 23) रोजी 'सदिच्छा' अपंग पुनर्वसन केंद्रातील अपंग विद्यार्थ्यांनी भेट दिली.
चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे सर यांच्यातर्फे सर्व अपंग विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच चेतना फाउंडेशनचे सचिव श्री विलास भोसले सर व खजिनदार श्री माने सर यांनी सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंगावर मात करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. तसेच अपंग पुनर्वसन केंद्रासाठी जेवढी मदत लागेल तेवढी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच योग्य असे शिक्षण घेऊन भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

