shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावीस गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन.

बावीस गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने  खा.  सुप्रिया सुळे यांना निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: गेले अनेक दिवस अनेक वर्ष इंदापूर तालुक्याचे राजकारण २२ गावच्या पाणी प्रश्नाभोवती फिरत आले आहे.अनेक लोकांनी या विषयाला कळीचा मुद्दा म्हणून आपली राजकीय पोळी भाजून घेतली . शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना २०२१ मध्ये जनसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बावीस गावच्या पाणीपुरवठ्याचा जीआर काढला परंतु दोनच दिवसात सोलापूर जिल्ह्यातील तथाकथित पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून हा जीआर कॅन्सल करण्यात आला.
 त्याच्यावर अनेक आंदोलने, मोर्चे ,रास्ता रोको झाले. यावेळी या सर्व आंदोलनात तेजपृथ्वी ग्रुपचे पुणे, सोलापूर हायवे वरती हिंगणगाव येथे रास्ता रोको करून हायवे वरतीच जे जागरण गोंधळ घालण्यात आले. तो विषय अख्या राज्यात चर्चला गेला होता. यानंतर अनेक आश्वासन झाली परंतु अजूनही बावीस गावच्या पाणी प्रश्नाचा विषय जशा चा तसा आहे .आणि आज त्याच विषयावरती तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांनी रेडणी येते सुप्रियाताई सुळे यांच्या शी २२ गावच्या पाणी प्रश्नावर चर्चा करून या भागाच्या खासदार म्हणून त्यांनी हा प्रश्न राज्य शासनाच्या मार्फत सोडून घ्यावा म्हणून त्यांना निवेदन दिले.
    नेहमीच गोरगरीब शेतकरी कष्टकरी विद्यार्थी यांच्यासाठी लढणारा इंदापूर तालुक्यातील तेजपृथ्वी ग्रुप हा शेतकऱ्यांसाठी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतो .मग पक्ष कोणता का असेना शेतकरी, विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न  या विषयाने तेजपृथ्वी ग्रुप काम करत आला आहे. आणि आज याचा प्रत्यक्ष अनुभव आला ते म्हणजे सुप्रियाताई सुळे या बावीस गावच्या भागात रेडनी येथे आल्या असता अनिताताई खरात यांनी त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन सादर करून माझ्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुला बाळा साठी हा आमचा बावीस गावचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण तो सोडवावा अशी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. या वेळी सुप्रियाताईंनीही मी नक्की यात लक्ष घालते असा अनिता खरात यांना  शब्द दिला. यावेळी तेजपृथ्वी ग्रुप  कडून सुप्रियाताईंना निवेदनाबरोबरच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन एक फोटो फ्रेम व सन्मानपत्र देण्यात आले.
close