अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाअंतर्गत टीम कार्यरत असून समुपदेशनबरोबरच उपचाराचे कार्यही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. समाजाने यात पुढाकार घेतल्यास एचआयव्ही एड्स प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले.
जागतिक एडस् दिन निमिताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगरच्या वतीने शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. घोगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. घोगरे म्हणाले की, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खाजगी दवाखाने यांच्याद्वारे एचआयव्ही तपासणीचे काम केले जाते. एचआयव्ही, एड्सचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची असुन समाजाने यात पुढाकार घेतल्यास एचआयव्ही एड्स प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे म्हणाले की, जिल्ह्यातील रुग्णांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सेवा केंद्रांमार्फत सेवा उपलब्ध करून घ्यावी. ज्यांना एचआयव्ही संसर्ग आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपचार देण्यात येत आहेत. तसेच शासकीय यंत्रणेसह समुदायाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत येडे यांनी जागतिक एडस् दिन का पाळला जातो याबाबतचे महत्व पटवून दिले. चित्रकला व निबंध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्नेहालय संस्थेच्या पुनर्वसन संकुल मधील विदयार्थ्यांच्या एचआयव्ही एडस् प्रतिबंधात्मक जनजागृतीपर नाटीकेने करण्यात आली.
कार्यक्रमास नोडल अधिकारी डॉ. निलेश गायकवाड, वरीष्ठ वैदयकिय अधिकारी डॉ. मनोज घुगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर, मानसोपचार तज्ञ डॉ. अशोक कराळे, डॉ. अरुण सोनावणे, डॉ. महाविर कटारिया, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैदयकिय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, मेटून मॅडम सी.के. जाधव, श्री. शिवाजी आधाव, विहान संस्थेचे प्रशांत येंडे, स्नेहालय संस्थेचे प्रविण मुत्याल, अमृतदिप प्रकल्पाचे सागर विटकर, स्नेहज्योत प्रकल्पाचे दिपक बुरम, वन स्टॉप केंद्राचे राहुल खैरनार, साथी संस्थेचे सचीन देठे इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सतीश अहीरे यांनी केले.
*रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद*
जागतिक एडस् दिन निमिताने आयोजित रॅलीस विद्यार्थी, विद्यार्थीनीं उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. रॅलीत जिल्हा रुग्णालय अधिपरीचारीका प्रशिक्षण केंद्र, सेंट मोनिका अध्यापिका महाविदयालय, सीएसआरडी महाविदयालय, पेमराज सारडा महाविदयालय, प्रयत्न नर्सिंग केंद्र, ए.एस. डि एड महाविदयालय, न्यु लॉ कॉलेज अहमदनगर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज इंजिनियरिंग कॉलेज, न्यु आर्टस् महाविदयालय, रेसिडेन्शियल महाविदयालय इ. महाविदयालयाचे विदयार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111

