shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत सावळीवीहीर येथे खंडकरी शेतकऱ्यांचा जल्लोष

राजेंद्र दुनबळे - शिर्डी
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक करण्यास तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची नुकतीच मान्यता मिळाल्याने खंडकरी शेतकऱ्यांमधून मोठा जल्लोष करण्यात येत असून राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे खंडकरी शेतकऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत करत आभार मानले.

या निर्णयाची माहिती सावळीविहीर येथील खंडकरी शेतकऱ्यांना मिळताच शुक्रवारी  सकाळी सर्व खंडकरी शेतकरी एकत्रित जमा होऊन गावांमध्ये या निर्णयाचे स्वागत करत तथा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर आभार मानणारा फलक लावून घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाच्या आनंद प्रित्यर्थ एकमेकांना पेढे भरवून मोठा जल्लोष करण्यात आला, यावेळी सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर खुर्द, निमगांव, निघोज, रुई आदी परिसरातील खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी खंडकरी शेतकरी बाळासाहेब जपे, सरपंच ओमेश जपे.यांनी मंत्रिमंडळात काल झालेल्या या निर्णयाचे स्वागत करत महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व विखे परिवाराने यासाठी मोठे प्रयत्न केले व त्याला यश आल्यामुळे सर्व खंडकरी शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे आभार मानले.

या निर्णयामुळे खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटदार वर्ग दोन या धारण अधिकाराने वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा धारणा प्रकार वर्ग एक करून खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची ही मागणी पूर्ण झाली आहे. खंडकरी शेतकऱ्यांमधून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

राज्यातील शेती महामंडळाच्या सन १९७८  ते १९८४  या कालावधीत साडेचार एकर मर्यादा ठेवून खंडकरी शेतकऱ्यांना १४ ते १७ हजार जमीन क्षेत्राचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सन २०११ मध्ये सिलिंग मर्यादा ठेवून काही क्षेत्र वाटप करण्यात आले. या निर्णयामुळे आता धारण प्रकार भोगवटादार वर्ग एक असा होणार आहे. त्याचा लाभ सुमारे २६०० खंडकरी शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील एकूण १४ शेती महामंडळाच्या मळ्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील सहा मळ्यांमधील खंडकरी शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा लाभ होणार आहे.

राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी मळ्यातील खंडकरी शेतकऱ्यांनाही याचा मोठा लाभ होणार असल्यामुळे सावळविहीर, लक्ष्मीवाडी येथे या निर्णयामुळे सर्व खंडकरी शेतकऱ्यांमधून मोठा जल्लोष करण्यात आला. व याचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार व ना. राधाकृष्ण विखे पाटील .तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,स्व. माधवराव गायकवाड यांचेही पूर्वीपासून त्यासाठी प्रयत्न होते व त्या प्रयत्नास यश आले आहे. सध्याच्या मंत्रिमंडळाने खंडकऱ्यांच्या हिताची बाजू लक्षात घेऊन हा निर्णय घेतला त्यामुळे सर्वांचेच यावेळी खंडकरी शेतकऱ्यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच विकास जपे, रमेश आगलावे, दगडू कापसे, पागीरे, राजेंद्र आगलावे, राजेंद्र जमधडे,भास्करराव जमधडे, नानासाहेब काळवाघे, गणेश आगलावे, विलास रेवगडे, कैलास सदाफळ, चंद्रकांत जपे, गोपीनाथ आगलावे, भारत जपे, पप्पू आगलावे ,संजय जपे, राजू जपे,दिनकरराव रोहम, सुनील जपे, किशोर आगलावे, आदींसह मोठ्या संख्येने खंडकरी उपस्थित होते.

*पत्रकार अजिजभाई शेख - राहाता
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close