शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३
रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ – डॉ.अमोल गायकवाड..!!
राहुरी महाविद्यालयामध्ये ‘रक्तदान शिबीर’ उत्साहात संपन्न..!!
राहुरी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबीन क्लब, राहुरी, राष्ट्रीय छात्र सेना, रोटरी ब्लड बँक आणि एचडीएफसी बँकेच्या सयुंक्त विद्यमाने ‘रक्तदान शिबीर’ दिनांक ०९/१२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.अनिता वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.राजेंद्र गोसावी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल गायकवाड म्हणाले, ‘रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. रक्तदान शिबिरामुळे समाज सुंदर होत आहे. स्वयंसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतल्यामुळे भावी पिढी घडणार आहे. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. अशा शिबिराच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करणार आहेत.’
यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत रोटरी ब्लड बँकेच्या डॉ.कौशिक मेळवणे, डॉ.केतन मेळवणे, श्री.शिवाजी कोळसे, श्री.अनिस पटेल, श्री.सौरभ वाडेकर, अंजली लांहूडे, शिवानी गुरसाडे, अक्षदा भोगे, दिपाली वाघमारे, वैभव शिरसाठ आणि विकास भोगडे तसेच एचडीएफसी बँकेचे श्री.भाऊसाहेब वांढेकर, हनुमंता कलहापुरे आणि फिरोज शेख यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय खिलारी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित नवनवीन उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्या, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेनाचे अधिकारी प्रा.संदीप पेरणे यांनी केले.
तर आभार प्रा.शिवाजी हुलुळे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५२ स्वयंसेवकानी रक्तदान केले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

