महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी राहुरी तालुक्यातील आठ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शेतकऱ्यांसाठी संशोधन करण्यासाठी दिल्या.यामुळे शेतकरी हित साधले जाईल अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान संशोधनं करून विकसित करणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.परंतु मूळ उद्देश्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत पाटील विसरले आहेत.आपले निकटवर्तीय डॉ महानंद माने, विशेष कार्यकारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत आहेत.
विद्यापीठात डॉ माने यांच्या अधिपत्याखाली आंतर विद्या व जलसिंचन विभागाद्वारे संशोधन न करता फुले जल या नावाने सीलबंद पाणी विकणे हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.परंतु डॉ माने यांनी फुले जल विक्री साठी आवश्यक ते परवाने घेतले नाहीत.व फुले जल अवैध विक्री करून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याने तक्रार अन्न औषध प्रशासन विभाग अहमदनगर यांचेकडे करण्यात आली होती.परवाना नसताना सिलबंद पाणी तयार करणे व विक्री करणे यासाठी या विभागाने शासनाची फसवणूक केली म्हणून कलम २६(२)iii,३१(१) आणि २.१.२(१)६३ अन्वये डॉ महानंद माने यांच्यावर राहुरी सत्र न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले व हा फुले जल सीलबंद पाणी प्रकल्प श्री कुटे अन्न औषध प्रशासन अधिकारी यांनी सील करून विक्रीस मज्जाव केला होता.
पण कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांनी डॉ माने हे खास मर्जीतील असल्याने यांना सांगितले मी तुमच्या पाठीशी आहे.सरकार माझ्या खिशात आहे.कुलगुरूंनी शक्कल लढविली व पुढे सील व मागील दाराने कॅनद्वारे विक्री करून हा प्रकल्प सुरू ठेवण्यास सांगितले. कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही आपण सेटलमेंट करू असे सांगत सर्व कार्यालयांना फुले जल पाण्याचे कॅन विकत घेणे बंधनकारक केले.
सीलबंद फुले जल बाटली बंद झाली तर उलट स्वच्छतेचे कोणतेही निकष न पाळता कॅन द्वारे मागील दाराने फुले जल विक्री मागील दाराने खुले आम सुरू आहे.यासाठी सर्व कार्यालयांना आंतर विद्या आणि जलसिंचन विभागाद्वारे बिले दिली जात आहेत . व हा कुलगुरूंच्या मर्जीतील अधिकारी डॉ माने यांनी विद्यापीठाचे किती उत्पन्न वाढविले हे दाखविण्यासाठी कुलसचिव परिपत्रक काढून फुले जलची बिले अदा करा नाहीतर तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी राहूरीतील कार्यालयांना देत आहेत.अन्न औषध प्रशासन अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करावे म्हणून नासिक विभागातील अधिकारी यांना कार्यक्रमाचे आयोजन करून बोलवले जाते.
शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने फुले जल प्रकल्प सील केलेला असताना हा प्रकल्प कुलगुंरूच्या अट्टाहासापाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करून सुरू आहे.तरी याची चौकशी करून डॉ माने यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.कुलगुरू गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकल्पअंतर्गत साहित्य जप्त करून संबधीत अधिकारी डॉ माने यांच्या वर प्रकल्प सील असतानाही अस्वच्छ कॅन द्वारे पाणी पुरवठा केल्याबद्दल कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

