shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे – डॉ. अविनाश रोकडे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३


राहुरी महाविद्यालयात ‘रिचार्जेबल एल.ई.डी. बल्ब कार्यशाळा’ संपन्न..!!

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे – डॉ. अविनाश रोकडे..!!

राहुरी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी, जि.अहमदनगर येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित, ‘रिचार्जेबल एल.ई.डी.बल्ब उत्पादन कार्यशाळा’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानासाठी मार्गदर्शन डॉ.अविनाश रोकडे, (Director of Avience Scientific) यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र.प्राचार्य डॉ.अनिता वेताळ या होत्या.
          यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अविनाश रोकडे यांनी, ‘ऊर्जेचे महत्व विशद करून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. वाढते वीजबिल आणि विजेची बचत करण्यासाठी रिचार्जेबल एल.ई.डी.बल्ब वापरावेत. त्यासाठी रिचार्जेबल एल.ई.डी.बल्ब तयार करण्याच्या कार्यशाळा प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये आयोजित कराव्यात. यातून उद्योजकता आणि तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन अपारंपरिक ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करून लोकजागृती करावी, यातून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे.’ यासाठी राहुरी महाविद्यालयाला आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन करण्यास Avience Scientific संस्था कायम अग्रेसर राहील, अशी ग्वाही डॉ.रोकडे यांनी दिली.

     ही कार्यशाळा दोन सत्रामध्ये संपन्न झाली. पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन आणि दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना रिचार्जेबल एल.ई.डी.बल्ब तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र.प्राचार्य डॉ.अनिता वेताळ यांनी आपल्या मनोगतामध्ये, ‘भौतिकशास्त्र विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी अश्या उपक्रमाचे स्वागत केले आणि सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.’

        उपप्राचार्य डॉ.राजेंद्र गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भौतिकशास्त्र विभागाने पुढाकार घेऊन सदरची कार्यशाळा महाविद्यालयामध्ये संपन्न केली. तसेच अश्या किमान कौशल्य शिक्षणाची विद्यार्थ्यांना गरज असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असे अभ्यासक्रम तयार केले जावे.’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.रवींद्र वायकर यांनी केले. त्यांनी विभागामार्फत आयोजित नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. तसेच या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी बडाख यांनी केले. तर आभार प्रा.दिपक निर्मळ यांनी केले. यावेळी प्रा.बाळकृष्ण अंगारखे (रसायनशास्त्र विभागप्रमुख), डॉ.विलास ठाकरे (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख), प्रा.मयुरी धनवटे (प्राणीशास्त्र विभागप्रमुख), भौतिकशास्त्र विभागातील प्रा.तेजल कोरडे, सौ.सोनाली रोकडे आणि महाविद्यालयाचे
५० विद्यार्थी उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close