शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३
गांधी पीस फाउंडेशन नेपाळ तर्फे मानद ऑफ डॉक्टरेट हा पदवीदान सन्मान सोहळा संपन्न..!!
नगर जिल्ह्य़ातील कृषीमिञ मा.सतिश भास्कर सोनवणे ( राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार विजेते) यांना मानद ऑफ डॉक्टरेट पदवीने सन्मानित..!!
नाशिक - डॉ राणा सर (संस्थापक गांधी पीस फौंडेशन नेपाळ),प्रा.डॉ.आनंद रत्नाकर आहिरे ,मा.तरन्नुम शेख(Mrs India International Queen Dubai (UAE) व मा.डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या हस्ते सन्मान.....
मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक येथे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ तर्फे मानद ऑफ डॉक्टरेट हा पदवीदान सन्मान सोहळा संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ चे संस्थापक डॉ राणा सर तसेच आहिरे स्पर्धा परिक्षा अकॅडमीचे संचालक व पुष्परत्न साहित्य समूह,नाशिक संस्थापक व अध्यक्ष आणि गांधी पीस फाउंडेशन नेपाळ चे ब्रँड अँबेसिडर प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे व नाशिक मधील समाजसेविका,नाशिक देवलाळी मतदारसंघाचे दिवगंत माजी आमदार भिकचंद दोंदे यांच्या सुपुञी मा.सुवर्णा भिकचंद दोंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते मा.तरन्नुम शेख(Mrs India International Queen Dubai (UAE) व नगर जिल्ह्य़ातील कृषीमिञ मा.सतिश भास्कर सोनवणे ( राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार विजेते) यांना मानद ऑफ डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. याशिवाय मा.तरन्नुम शेख(Mrs India International Queen Dubai (UAE) यांची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसीटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा मधील नांदगाव गावचे सुपुत्र कृषिमित्र श्री सतीश भास्कर सोनवणे याना यापूर्वी राष्ट्रीय कृषिरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांचे कार्य पंचक्रोशीत नाही तर पूर्ण जिल्ह्यात राज्यात पसरलेले आहे
सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्रा.डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांनी आपल्या मनोगतात गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ या संस्थेची माहिती सांगितली व मानद ऑफ डॉक्टरेट पदवीचे महत्त्व व ती कशी प्राप्त केली जाते ते नमूद केले.उच्च शिक्षणातूनच समाजात परिवर्तन होते. आपण ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रात निरंतर कार्य करीत राहिले तर आपल्या कार्याची नक्कीच दखल घेतली जाते असेही यावेळी सांगण्यात आले.
समाजसेविका मा.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी स्वपरिचय देऊन ज्यांना मानद ऑफ डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली त्यांचे शब्दसुमनाने स्वागत केले. मानवी जीवनातील पुरस्काराचे महत्त्व विशद केले.
या सोहळ्यात मा.तरन्नुम शेख यांनी स्वजीवन स्पष्ट केले. तर प्रा. डॉ.आनंद आहिरे यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. आज या करियर पर्यंत आले त्या पाठी माझे पती आहेत हे या ठिकाणी नमूद केले. तर मा.सतिश सोनवणे यांची निस्वार्थ शेतकरी सेवा ही यावेळी मुख्य करून नमूद करण्यात आली तसेच त्यांनी आतापर्यंत वृक्षारोपण वर जास्त भर दिला असून भविष्यात हे कार्य अविरत सुरू राहण्याचे आश्वासन दिले तसेच ते विविध शेतकरी बांधवासाठी सामाजिक कार्य करीत असतात.
कविसंमेलनाच्या अगोदर जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कवी संमेलन घेण्यात आले कवी मा. माणिकराव गोडसे, मा.अरुण घोडेराव, कवयिञी,मा. माधुरी अमृतकर, सटाणा,मा.कविता बिरारी,नाशिक,मा. संध्यारजनी सावकार, मा. छाया सोनवणे, कवी मा.अण्णासाहेब बडाक, मा. रमेश चौधरी,मा. स्वप्नील धने व इतरांनी विविध विषयावर बहारदार कविता सादर केल्या .आहिरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
यावेळी नाशिक मधील मा.इरफान शेख,जाॅइंट सेक्रेटरी, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड यांचा सन्मान करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. आदित्य आमटे यांनी केले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

