shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक आणि विद्यार्थीलळा एक निरागस नातं



श्रीरामपूर प्रतिनिधी:



कारेगांव येथून नुकतीच बदली होऊन पदवीधर प्रमोशनने उंबरगांव शाळेत आलेले नानासाहेब कडूसर यांना भेटण्यासाठी त्यांची कारेगांवची विद्यार्थिनी माधुरी पवार व तिचे  आईवडील आले... सरांचे त्यांनी खूप गुणगान केले... मुलगी सरांच्या प्रेमळ स्वभावामुळे रोज शाळेत यायची...पण शाळेत हे लळा लावलेले सर आता दिसत नाहीत म्हणून ती दुःखी दिसत होतीतिची ही खंत पाहून आईवडील तिला घेऊन उंबरगांव शाळेत आले...कडूसरांची भेट घेऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सरांना बक्षीस देऊन सत्कार केला यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते...सरांचेही डोळे भरून आले .आईच्या पदराखाली असलेली बालके शिक्षकांच्या सानिध्यात येतात आणि ऋणानुबंधाच्या गाठी कशा पक्क्या होतात ते समजतही नाही ..अशा भेटीनंतर कळतं की किती घट्ट नातं असतं विद्यार्थी शिक्षकाचे..कडू सरांना ही कामाची पावतीच होती ..या कामाच्या पावतीने शिक्षक होण्याचा सार्थ अभिमान वाटतो...चांगले काम केले की आपली दखल कोणीतरी घेत असत. कधी अशा भेटीतून....असे अनेक शिक्षक आहेत ज्यांना असे मोलाचे विद्यार्थी अशा कृतीतून एक प्रकारे पुरस्कारापेक्षाही मोठी भेट देत असतात....
कडूसर यांच्या या विद्यार्थी भेटीचा प्रसंग प्रेरणादायी आहे...शिक्षक आणि निरागस विद्यार्थी यांचे अतूट नात्यांचा गहिवर मराठी  प्राथमिक बऱ्याच वेळा दिसून येतो. ज्ञानमंदिरातील या नात्याला कोणतं नाव द्यावं बरं? 

डॉ.रामकृष्ण जगताप
संमोहनतज्ज्ञ, श्रीरामपूर.
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close