shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ,सुधारित वेळापत्रक जाहीर


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
भारत निवडणूक छायाचित्र मतदार याद्यांच्या १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनाकांवर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली असुन त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. १२ जानेवारी, २०२४ दावे व हरकती दाखल करणे, बुधवार दि. १७ जानेवारी, २०२४ मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, मतदार यादी डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी मतदार याद्यांची छपाई करणे, सोमवार दि.२२ जानेवारी, २०२४ अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये झालेल्या बदलाबाबतची सर्वांनी नोंद घेऊन मतदार यादीमध्ये आपल्या नावाची खातरजमा करुन नाव समाविष्ट करणे,नाव, पत्त्यामध्ये बदल करणे, नावांची वगळणी करणे यासाठी नमुना क्र. ६,७,८ व ८ अ भरुन देण्याासाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close