shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चा : महारुद्र पाटील यांची माहिती.

खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चा :  महारुद्र पाटील यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला 'शेतकरी आक्रोश मोर्चा खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी (ता. २९) रोजी इंदापूर तालुक्यात येणार असल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली असून या मोर्चाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे हे करणार आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण, पळसदेव, इंदापूर, निमगाव केतकी येथे पदयात्रा व शेतकरी संवाद होणार असल्याचे   महारुद्र पाटील सांगितले.  "आता पुरी झाली मन की बात, आता हवी जन की बात यानुसार विविध  प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला आहे.
आज भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा इंदापूर तालुक्यात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये शुक्रवारी सकाळी १० वाजता भिगवण येथे पदयात्रा व शेतकरी संवाद, दुपारी १२ वाजता पळसदेवला पदयात्रा व शेतकरी संवाद, दुपारी दीड वाजता इंदापूरला पदयात्रा व शेतकरी संवाद झाल्यानंतर ३ वाजता निमगाव केतकी येथे पदयात्रा व शेतकरी संवाद होणार आहे. त्यानंतर मोर्चा बारामती तालुक्यात जाणार आहे.
close