महेंद्र रेडके व भारत बोंगाणे यांनी १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन केला अंकिता पाटील- ठाकरे यांचा वाढदिवस साजरा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवसूत्रां पैकी गरीब कुटुंबाला आधार व्हा या सूत्राची व पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांच्या संकल्पची केली पूर्ती .
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील - ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पडस्थळ (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील युवा नेतृत्व महेंद्र रेडके व भारत बोंगाणे यांनी अंकिता पाटील - ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेल्या नवसूत्रानुसार वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला होता. तसेच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोदीजींच्या नवसूत्रीपैकी असलेल्या' गरीब कुटुंबाला आधार व्हा' हे सुत्र प्रत्यक्षात अमलात आणावे. या सूत्रानुसार आपण एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांला वर्षभरासाठी शैक्षणिक दत्तक घेऊन कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करावा. आपण राबवलेला हाच उपक्रम वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असे आवाहन त्यांनी सोशल पोस्टद्वारे केले होते. त्यास प्रतिसाद देत प्रत्येकी ५ - ५ असे १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे जाहीर केले. त्यांच्या या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवसूत्री कार्यक्रम व भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांचा संकल्प सत्यात उतरवून अनाठायी खर्च न करता एक प्रामाणिक सहकारी तसेच नवीन पिढीतील भविष्य घडवण्याची सामाजिक जबाबदारी घेतल्याचे दिसून येते. त्यांच्या या संकल्पनेचे व निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी राजेंद्र बोंगाणे, गणेश गव्हाणे, महादेव गोळे, प्रतीक सुतार, मुख्याध्यापक रमेश जाधव, सहशिक्षक संतोष हेगडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

