shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्यावरती अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

नीरा भीमा कारखान्यावरती अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 
फोटो:- निरा भिमा कारखान्यावरती अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
इंदापूर : प्रतिनिधी दि.26/12/23
                 शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.26) वृक्षारोपण करण्यात आले. अंकिताताई पाटील ठाकरे ह्या अभ्यासू नेत्या असून, त्या सहकार, कृषी, शिक्षण, महिला व युवा वर्ग आदी क्षेत्रांच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे गौरवोदगार याप्रसंगी कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी काढले. यावेळी कार्यकारी संचालक हेमंत माने, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी परिसरात विविध रोपांचे वृक्षारोपण केले.
_______________________________

close