shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीरश्री मालोजीराजे गढीचे व हजरत चांदशाहवली बाबांच्या दर्ग्याचा जिर्णोद्धार माझ्या काळात मी करतोय माझा सहभाग आहे यासाठी मी भाग्यवान - आमदार दत्तात्रय भरणे.

वीरश्री मालोजीराजे गढीचे व हजरत चांदशाहवली बाबांच्या दर्ग्याचा जिर्णोद्धार माझ्या काळात मी करतोय माझा सहभाग आहे यासाठी मी भाग्यवान  - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधि:इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व हजरत चांदशाहवली  बाबा दर्गाहला विकास आराखड्यास नियोजन विभागाकडून ३७ कोटी २८ लाख रुपयांचा निधीची मंजुरी मिळाला असुन याचा जीर्णोद्धार माझ्या काळात मी करतोय माझा सहभाग आहे यासाठी मी भाग्यवान असल्याचे 
 आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवार ( दि.१ डिसेंबर ) रोजी दुपारी, इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे गढीवरील हजरत चांदशाहवली बाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले. यावेळी तमाम शिवप्रेमी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवप्रेमी व मुस्लिम बांधवांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचा जाहिर सत्कार केला. यावेळी भरणे माध्यमांशी बोलताना सांगितले. 

यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, १५ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये विधान सभागृहात मी स्वतः लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर चर्चा करताना पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उत्तर देताना या गढीचे संवर्धन व हजरत चांदशाहवली बाबा दरगाह विकास करणे या संदर्भात आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.  

त्यांनतर २० मार्च २०२३ रोजी पर्यटन मंत्री यांच्या विधानभवन दालनात बैठक आयोजित केली होती. संबंधित अधिकारी तसेच वास्तु विशारद व सल्लागार यांच्याकडून या आराखड्याची माहिती व पार्श्वभूमीचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी, पुणे यांना तत्काळ आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

त्यांनतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. यावेळी तयार केलेला आराखडयाचे सादरीकरण झाले. परंतु अजितदादा यांनी सूचना केल्या की, पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करणेस अडचणी निर्माण होत आहेत. नियोजन विभागाकडून हा आराखड तयार करण्याच्या सूचना दिल्या. वास्तु विशारद व सल्लागार यांची नेमणूक करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. जिल्हाधिकारी पुणे यांनी इंदापूर नगरपरिषदेकडून तातडीने जागा उपलब्धता व सद्यस्थितीबाबतचा व वस्तुस्थितीचा आराखडा सादर करण्याच्या सूचनाही अजितदादा यांनी दिलेल्या होत्या.

त्यांनतर  ८ ऑक्टोबर २०२३ रोजी इंदापूर येथे मालोजीराजे यांचे गढीचे ठिकाणी मी स्वतः व इतर अधिकारी, शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत पाहणी करून, त्याचठिकाणी बैठक घेतली. या बैठकीत केलेल्या सूचना व आराडख्यात वास्तु विशारद यांनी केलेले सादरीकरण याबाबत एकत्रीत अहवाल पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यांनतर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीची मुख्य सचिवांचे समिती कक्ष, मंत्रालय येथे बैठक झाली व या बैठकीत आरखड्यास मान्यता देण्यात आली.

त्यांनतर  २० ऑक्टोबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह, पुणे येथे उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादावयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विकास समितीची बैठकीमध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये आराखड्यास मान्यता देण्यात आली व आराखडा नियोजन विभाग मंत्रालयामध्ये सादर करण्यात आल्या. त्यांनतर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी तिर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकारी समितीची बैठक राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मान्यता देण्यात आली व शिखर समिती यांच्याकडे आराखडा सादर करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या आराखड्यास शिखर समितीने चक्राकार पद्धतीने मान्यता दिली. मंत्रीमंडळ बैठकीस मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आली व दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासन नियोजन विभागाकडून या विकास आराखड्यास
शासन निर्णय प्राप्त झाला व इंदापूर शहरातील वीरश्री मालोजी राजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व हजरत चांदशाहवली बाबा दरगाह विकास आराखड्यास नियोजन विभागाकडून ३८ कोटींच्या निधीस मंजूरी देण्यात आली.

चौकट : खोटे बोलणाऱ्यास चांदशाहवली बाबा बघून घेतील 

वीरश्री मालोजीराजे गढी व हजरत चांदशाहवली बाबांच्या दरगाहच्या संवर्धनासाठी रात्रंदिवस एक करून प्रस्ताव तयार केला. शेकडो बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विधानसभेत लक्षवेधी मांडली. शहरातील अनेक नागरिकांना माहिती व्हावे म्हणून त्यांना बैठकीला सोबत घेवून गेलो. एवढे कष्ट करून देखील काहीजण आम्हीच हे काम केले असल्याचा बेबनाव करतात. मी जर खोटे बोलत असतो तर मला एवढा त्रास झाला नसता. मात्र ह्या कामाचे फुकटचे श्रेय लाटू पाहणाऱ्यांना चांदशाहवली बाबा बघून घेतील. असे मजारवर हात ठेवून आमदार भरणे यांनी शपथ घेतली.
close