आंतरराष्ट्रीय - आंतरसांस्कृतिक चर्चासत्रात सत्राध्यक्षचा सन्मान
सातारा प्रतिनिधी:
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी भाषा संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी नुकतेच मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमधील मराठी विभागात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ‘मॉरिशस मधील मराठी कथेतील संस्कृती दर्शन’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सत्राध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाने दिलेली जबाबदारी पार पाडल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘ महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर ,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय चर्चांसत्रात आयोजन २३ व २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मॉरिशस मोका येथील सबंधित इन्स्टिट्यूटच्या सुब्रमणिया भारती सभागृहात करण्यात आले होते. महाराष्ट्रातून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्याकडून मॉरीशस मध्ये गेलेल्या ५० सहभागी प्राध्यापकामध्ये त्यांचा समावेश होता. २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले . तिसऱ्या सत्रात त्यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत डॉ. मांतेश हिरेमठ ,डॉ. धनंजय होनमाने,डॉ. प्रकाश दुकळे ,डॉ.युवराज देवाळे,डॉ.युवराज खरात,डॉ. विपीन वैराट,डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रा.निशी हिरो लक्ष्मी इत्यादी १० प्राध्यापकांनी निबंध वाचन केले.
मराठी विभाग प्रमुख डॉ.मधुमती कुंजल यांनी या निबंधाचे विश्लेषण केले. कोलंबस हॉलिडे व भ्रमंती कोल्हापूर या पर्यटन घडवणाऱ्या संस्थांनी मॉरीशस येथील विविध स्थळांना भेट दिल्या. सर शिवसागर रामगुलाम विमानतळ ,लिटल इंडिया रेस्टॉरंट,सितार रेस्टारंट,बेले मरे येथील वाटर स्पोर्टला भेटी दिल्या जिथे समुद्रातून सी वॉक, परांसेलिंग ,टूबराईड,तसेच नदी आणि समुद्रकिनारा यांच्या ठिकाणी असलेल्या धबधब्यास बोटीने प्रवास घडवून आणला. मोरीशसच्या दक्षिणेस असलेल्या हिरे निर्मितीच्या कारखान्यांना भेटी दिल्या. तसेच जहाज नमुना बांधणी दुकानाना भेट दिली. तसेच निद्रिस्त ज्वालामुखीचे केंद्र दाखवण्यात आले. तेथील तलाव ,शिवमंदिर ,बिगार्द रेस्टारंट ,तसेच देस कलर्स दरीतील निसर्ग रम्य ठिकाणी ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेले विविध रंगाचे खडक तिथे दाखवण्यात आले. मॉरीशस येथील उत्तरेकडे असणाऱ्या सीटेदेले किल्ल्यास भेट दिली. जिथे जुन्या तोफांची माहिती घेतली. हॉर्स रेस ग्राउंड , पोर्ट लुईस सभागृह ,शासकीय कार्यालये ,पोर्ट लुईस बंदर व त्या नजीकच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला भेटी दिल्या. तेथील मेट्रो रेल्वे पाहण्यात आली. तसेच कौन फु टी फॅकटरी तसेच स्पेशल फूड कोर्टला भेटी दिल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विविध ठिकाणाहून पूर्वी १८३३ -३४ ला इंग्रजांनी ज्यांना मजूर म्हणून या बेटावर नेले त्या अप्रवासी घाट या ठिकाणी मजुरांचे वास्तव्य होते तेथील संग्रहालय दाखवण्यात आले. महाराष्ट्र भवन ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,मराठी भाषा स्पिकिंग कोर्स युनियनला भेटी दिल्या. मॉरिशस विद्यापीठ, मोका येथील संग्रहालय ,भारत आणि मॉरिशस आंतरसांस्कृतिक संबंधाचा अभ्यास प्राध्यापकांनी केला. भूगोल ,ऊस शेती ,मानवी जीवन,पर्यटन ,व्यापार,या बेटावर आलेल्या राज्यकर्त्यांची माहिती, या बेटावरील आफ्रिकन,भारतीय, चीनी ,पक्षी ,प्राणीजीवन ,उद्योग ,डॉलर,भारतीय रुपये व मोरीशास रुपये यांच्या किंमती, सौंदर्यस्थळे, कलाकृती ,विद्यापीठातील मराठी, हिंदी साहित्य ,डोडो पक्षी ,मराठी बोली, क्रीयोल बोली ,हिंदी , भोजपुरी बोली ,हिंदू मंदिरे , परदेशी पर्यटक यांचेशी संवाद, मिश्र संस्कृती ,वेशभूषा रितीरिवाज इत्यादीबद्दल या अभ्यास सहलीत माहिती घेतली. डॉ,धनंजय होनमाने यांनी एकादशी निमित्त तिथे नितीन बापू यांचे घरी कीर्तन केले. त्याला कोरस म्हणून प्रा.सिद्धमल्लया हिरेमठ,डॉ.सुभाष वाघमारे,डॉ, संग्राम थोरात यांनी साथ दिली. तिथे विविध देवतांच्या आरत्या नितीन बापू यांनी सादर केल्या. तिथली देवदेवतांची पूजा पद्धती पाहिली. प्रा.प्रदीप मोहिते,आनंद बल्लाळ,डॉ.संगीता पैकेकरी,प्रा. जयश्री बाबर,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,प्रा.विजयश्री गवळी, लक्ष्मन शिंदे, डॉ.रूपा च्यारी व डॉ.पूर्णानंद च्यारी यांनी प्रासंगिक नाट्य तयार करून दिमडी, खंजिरी यांचा वापर करून गीतनाट्य सादर केले. गोव्यातील डॉ.पूर्णानंद चारी यांनी,माझे माहेर पंढरी’हा अभंग सादर केला. हवामान,ऋतू यांची माहिती घेण्यात आली. मॉरीशस म्हणजे एक छोटा भारत असल्याच्या प्रतिक्रिया तेथील अनेकांनी दिल्या. शांतता ,शिस्त ,जिव्हाळा ,आणि हिरवा निसर्ग,मिश्र संस्कृती याचे दर्शन पदोपदी घडले. गोवा राज्यापेक्षाही लहान असलेल्या मॉरिशसने आर्थिक प्रगती चांगली केलेली असून जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडील लोक, संस्कृतीचे प्रदर्शन करतात पण तेथील मराठी लोक संस्कृती जगतात असे मत प्राचार्य डॉ. शेळके मांडले. डॉ.मधुमती कुंजल,नितीन बापू ,निशी हिरो लक्ष्मी,डॉ.बिदन आबा,श्रीमती देवयानी नागीया, श्रीमती विमला कुष्निया, लक्ष्मीबाई बाबजी, प्रतिमा इश्राम, अंजू मालू राम गुलाम ,या भाषा विभागातील अनेक प्राध्यापक व साहित्यिक यांनी आपुलकीने भेट घेऊन संवाद केला. सर्वांनी दिवाळीचा फराळ तेथील निवडक मराठी माणसाना भेट देऊन एकमेकांचे हितचिंतन केले. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष डॉ.शिवकुमार सोनाळकर, डॉ. अनिल गवळी,माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश दुकळे,विद्यमान अध्यक्ष डॉ.भरत जाधव,सचिव प्रा.डॉ. मंतेश हिरेमठ ,कार्यकारिणी इत्यादींनी या अभ्यास पर्यटनसहलीचे उत्तम आयोजन केले. कोलंबस होलीडेजचे रवींद्र गिलबिले व भ्रमंती टूरचे ऋषिकेश पाटील यांनी समन्वयाने उत्तम आयोजन केले. युकेच्या विस्तारा विमानाने येण्या-जाण्याचा अनेकांचा पहिलाच प्रवास असल्याने अनेकांना आनंद मिळाला आणि अनेकांनी जगातील विविध देशात जाऊन पर्यटन करण्याचे संकल्प देखील केले. विमानतळावर उतरल्यानंतर तेथील आफ्रिकन ‘सेगा’ हे नृत्य करून टीमचे तेथील आयोजकांनी स्वागत केले. मॉरीशस मधील गाईड शहनाज व रुपा यांनी मॉरीशियन स्थळे व संस्कृती यांचा इतिहास व वर्तमान या विषयीची माहिती दिली. परदेश भेटीने ज्ञान,आनंद , संस्कृती,भाषा ज्ञान , साहित्य, कला ,जीवनविषयक विविध दृष्टीकोन मिळतात आणि मैत्रीभावना वाढीस लागते असे डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे चेअरमन इंद्रदत्त राम,राजकुमार राम प्रताप, भारतीय भाषा विभाग प्रमुख डॉ. रामस्वामी अपादो,वाय मुन्बोध,श्री.बिरबल डॉ.वेदोत्तमा कुंजल, प्रमुख अतिथी संसद सदस्य आश्ले इत्तू,शिरीष रामा, असत गोविंद,इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.अभंग गीतगायन, खंजिरीवादन, सेगा नृत्य इत्यादीत ते सहभागी झाले. तेथील विविध स्थळांचे फोटो घेत व माहिती त्यांनी मिळवली सातारयातील राजपुरोहितचे कंदी पेढे, रिटकवली चिवडा व आपली कवितासंग्रह पुस्तके तेथील मराठीचे प्राध्यापक यांना देऊन प्रा.वाघमारे यांनी आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
*ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण एस. भिसे
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

