shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांनी घेतले हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे दर्शन.

राजवर्धन पाटील यांनी घेतले हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे दर्शन.
   इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर येथील हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत चाँद शाहवली बाबांच्या उरुस निमित्त निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेऊन बाबांच्या  मजरावर फुलांची चादर चढवली तसेच सर्वांच्या सुख समृद्धी आणि आनंदी व चांगल्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी यावेळी त्यांनी प्रार्थना केली.
    हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत चाँद शाहवली बाबांच्या उरुसामध्ये इंदापूर शहर व आसपास परिसरातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात या पवित्र श्रद्धेच्या स्थानाचे दर्शन घेत असतात.
      राजवर्धन पाटील यांनी ही परंपरा जोपासत या पवित्र श्रद्धास्थानाचे दर्शन घेतले.
     यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
close