shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधिज्ञ. राहुल मखरे यांनी चाँदशहावली बाबांना केली चादर अर्पण.

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधिज्ञ. राहुल मखरे यांनी चाँदशहावली बाबांना केली चादर अर्पण.

उरूसानिमीत्त विधीज्ञ. राहुल मखरे यांचे हस्ते प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू. 
इंदापूर : प्रतिनिधी

     हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारे इंदापुरातील चाँदशहावली बाबांचा उरूस काल (दि. २०) रोजी पासून सुरू झाला आहे. त्या निमित्ताने बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ. राहुल मखरे यांनी चाँदशहावली दर्गाह येथे उपस्थित राहून चाँदशहावली बाबांना चादर अर्पण केली. कमिटीच्या वतीने उपस्थितांना एड. मखरे यांच्या हस्ते प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली.
      चाँदशहावली बाबांचा दर्गाह हे समस्त इंदापूरकर वासीयांचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी चाँदशहावली बाबांच्या उरूसानिमीत्त हिंदू - मुस्लिम एकत्र येऊन चाँदशहावली बाबांना चादर अर्पण करून अभिवादन करतात. हिंदू - मुस्लिम समुदायातील सामाजिक सलोखा या निमित्ताने दिसून येतो. 
      उरूस कमिटीचे वतीने एड. राहुल मखरे व वसीम शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उरुस कमीटीचे अध्यक्ष आझादभाई पठाण, वसिमभाई शेख, महादेव चव्हाण सर, हमीद आतार, आझमभाई पठाण, नागेश भोसले, संतोष क्षीरसागर, आक्रम जहागीरदार, अख्तर मुलाणी, अल्तमश शेख, सकलेन पठाण, अमन शेख, सद्दाम बागवान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
close