shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शैक्षणिक सहल करुन परतणा-या एस.टी बसने थांबलेल्या आयशर ट्रकला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर‌ चौघेजण जखमी.

 शैक्षणिक सहल करुन परतणा-या एस.टी बसने थांबलेल्या आयशर ट्रकला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर‌ चौघेजण जखमी.
   शिर्डी  एक्सप्रेस वृत्तसेवा अकलूज: अकलूज- शैक्षणिक सहल करुन परतणा-या एस.टी बसने थांबलेल्या आयशर ट्रकला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर‌ चौघेजण जखमी झाले असून हि घटना वटफळी ता.माळशिरस हद्दीत घडली.या अपघातातील बस चालक व ट्रक चालक दोघावर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अकलुज पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार बावडा (ता.इंदापुर‌) येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तीन एस.टी. बसने कोकण दर्शन शैक्षणिक सहल करुन परतत असताना त्यापैकी अकलूज आगाराची एस.टी.बस क्र.एम.एच.१४ बीटी ४७०१ मधील ४० विद्यार्थ्यांच्या बसने आज गुरुवारी पहाटे ६ च्या सुमारास अकलूज माळशिरस रोडवर वटफळी हद्दीत थांबलेल्या आयशर ट्रक क्र. एम.एच.०९ एफ.एल.३३९८ ला धडकल्याने या अपघातात शिक्षक बाळकृष्ण हरीबा काळे वय ५३ रा.रेडणी ता.इंदापुर हे जागीच ठार झाले तर शिक्षिका संगिता शिवाजी कवडे व शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाट रा.बावडा विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी शेटे व विद्यार्थी श्रवण घाडगे हे जखमी झाले असून जखमीवर स‌ंग्रामनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात एस.टी.चालक जावेद राजेखान पठाण याने त्याच्या ताब्यातील बस रस्त्याकडे दुर्लक्ष करीत हयगयीने चालवत रस्त्यावर इंडिकेटर अथवा सुचना फलक न लावता रस्त्यात थांबलेल्या आयशर ट्रकला धडक दिल्याने बाळकृष्ण काळे मयत झाले असुन चौघेजण जखमी झाल्याची फिर्याद रमाकांत शिरसाट यांनी दिल्यावरुन या अपघाताची गु.र.नं.८९१/२०२३ ने भादवि २७९,३३७,३३८ वगैरेने अकलूज पोलिस ठाण्यात नोंद होवुन ट्रक चालक चंद्रकांत आकाराम पाटील‌ रा.खडुळे ता.गगनबावडा जिल्हा कोल्हापूर तर एस.टी.चालक जावेद राजेखान पठाण या.खंडाळी अकलुज आगार चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हे.काॅ.पांडुरंग मुंडे हे करीत आहेत
close