वडापुरी ग्रामपंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला केले अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (ता. इंदापूर ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय वडापुरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते महेश शिर्के, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे,शिवाजी चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, शिवाजी तरंगे ,अशोक पासगे, चंद्रकांत चंदनशिवे, महादेव चंदनशिवे, तुषार चंदनशिवे, आप्पाजी पासगे, देवदत्त चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, दादा चंदनशिवे, संजय तोबरे, रंजीत चंदनशिवे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. .बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात 'महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.

