shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद मांगी शाळा व्यवस्थापन समिती वर प्रकाश ननवरे यांची निवड...!

करमाळा प्रतिनिधी:-
आज मांगी येथिल जि.प.प्रा.शाळा  व्यवस्थापन समितीची निवड जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक पोतदार सर यांच्या अध्यक्षतेखाली  झाली.नविन शाळा समिती अध्यक्ष म्हणून उमेश दादा बागल यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.


उपाध्यक्ष म्हणुन सौ. कल्पना निळकंठ राऊत,सौ.सोनाली राजेश संचेति,सौ.विक्रमा संतोष बनसोडे,सौ.काजल राहुल अवचर या चारही महिला बिनविरोध निवडी करण्यात आल्या .तसेच सदस्य म्हणून प्रकाश उत्तम ननवरे, गुलाब दत्तु क्षिरसागर,अमोल पोपट गायकवाड यांच्या निवडी करण्यात आल्या .माता पालक समिती मध्ये सौ.सिमा अशोक गवळी,सौ.शीला प्रविण अवचर,सौ.कल्याणी अमोल माने या सर्व महिला सदस्य निवडी करण्यात आल्या तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रकाशराव काळे सर यांची निवड सर्वानुमते  करण्यात आली ,या सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या .सर्व नवनिर्वाचित सदस्य ,अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वाचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक पोतदार तसेच शाळेचे सर्व शिक्षक तसेच कौले सर,पवार मॕडम,देमुंडे मॕडम,पोतदार मॕडम यांनी  केले.
close