shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे श्रीराम अक्षदा कलशाचे पूजन

 पडस्थळ येथे  श्रीराम अक्षदा कलशाचे पूजन
इंदापूर प्रतिनिधी:आज दि. ३० डिसें. २०२३ रोजी पडस्थळ ता.इंदापूर येथे आयोध्या येथील श्रीराम मंदिर अक्षदा कलशाचे पूजन करण्यात आले. सकाळी १० वा. पडस्थळ येथे अक्षदा कलशाचे आगमन झाले. त्यानंतर हनुमान मंदिरात पवित्र कलशाचे पूजन करून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसह टाळमृदंगाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील अबाल वृद्धांसह महिला व वारकरी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 भजन गायन व श्रीराम प्रभूंच्या घोषणेने परिसर निनादून गेला होता. जागोजागी महिलांनी रांगोळी काढून अक्षदा कलशाची पूजा व आरती केली.आपण खरोखरच भाग्यवान आहोत की भव्य राममंदिर निर्माण 'याची देही याची डोळा' अनुभवत आहोत. अयोध्येतील मंदिरात आपल्या आराध्य रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पाचशे वर्षांचा हा लढा संपन्न झाला अशीच भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होती.या कार्यक्रमासाठी गावातील भजनी मंडळ तसेच रामेश्वर पवार, लक्ष्मण कोकरे,संभाजी बोंगाने, वालचंद कोळेकर, पोपट हांडाळ, रेवन आवटे, नवनाथ बोंगाने,अनंता राऊत यांनी खूप कष्ट घेतले. गावातील पुजारी गुरुनाथ गोरे यांनी आरती करून, प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली. अशी माहिती महेंद्र रेडके यांनी दिली.
close