उद्या ३१ डिसेंबर रोजी इंदापूर मध्ये सायं. ७ वा. दारू नको दूध प्या हा उपक्रम.
इंदापूर : आवाज तरुणाईचा, संकल्प व्यसनमुक्त राष्ट्र निर्मितीचा !
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, शाखा - इंदापूर विधायक ३१ डिसेंबर
दारु नको, दूध प्या ! मार्गदर्शक :- युवकमित्र, ह.भ.प. बंडातात्या कराडकर
"३१ डिसेंबर" अशाच एखाद्या बेधुंद क्षणी "एकच प्याला" म्हणून केलेली दारुची सुरुवात आयुष्याची राख रांगोळी करते या एकच प्याला चे व्यसनात रुपांतर कधी होते ते समजतही नाही. दारु पिल्यामुळे काय होतं ते एखाद्या मातेला विचारा जीचा नवरा दारुच्या व्यसनात बुडाला होता किंवा सध्या दारु पित आहे. ते एखाद्या मुलाला विचारा ज्याचे वडील दारु पित होते किंवा पित आहेत. दारु पिणारा पिऊन पिऊन कधी मरेल तो मरेल परंतु त्याच्या कुटूंबातील व्यक्ती जिवंतपणी नरक यातना भोगत असतात. कोवळ्या वयातील ही मुले या आघातामुळे आयुष्यभर सावरु शकत नाहीत. हे दारुडे बाप आत्मविश्वास नसलेली एकतर घाबरट किंवा उध्दट पिढीला जन्म देतात. नुसती सुपारी खाऊन बघू म्हणून चालू केलेली गुटखा माव्याची सुरुवात, पदोपदी खारीक, खोबरं खाल्यासारखं गुटखा खाऊन रस्त्यावर
पिचकाऱ्या मारीत फिरणारे, सिगारेट ओढून छातीचा पिंजरा झालेले (नावाला) तरुण, आता जीवावर बेतायची वेळ आली तरी सवय सुटत नाही. तोंड उघडत नाही. तिखट खाता येत नाही अशी कित्येक तरुणांची अवस्था झाली आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल परंतु गुटखा, मावा, तंबाखू पाहिजेच असे कितीतरी जण अभिमानाने सांगताना दिसतात परंतु हे सर्व करीत असताना आपल्या परिसरातील मुलांवर व घरातील लहान मुलांवर काय परिणाम होईल याचा थोडा विचार करायला हवा कारण आपण म्हणजे घरातील कर्ते, पैसे कमवणारे, सहसा आपले निर्णय चुकत नाहीत म्हणजे तुम्ही त्यांचे आदर्श असता पर्यायाने चांगले विचार जसे स्विकारले जातात तसेच व्यसनांचे पण अनुकरण केले जाते त्यात चुकीचे किंवा निषेधार्ह असे
त्यांना काही वाटत नाही. कोणत्याही देशाची युवापिढी जितकी निरोगी व सशक्त असेल तितका तो देश सामर्थ्यवान मानला जातो. मूठभर निर्व्यसनी तरुण मावळ्यांना हाताशी धरुन छत्रपती शिवरायांनी देशाचा इतिहास बदलला हे आपणास ज्ञात आहेच. जेंव्हा फ्रान्समधील तरुण पिढी व्यसनाने बरबाद झाली त्याच
काळात हिटलरने फ्रान्सवर हल्ला करुन अल्पावधीमध्ये त्यांचा पराभव केला. सध्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी फ्रान्सच्या पराभवाचे कारण ओळखून तरुण पिढी व्यसनमुक्त कशी राहील यावर भर दिलेला आहे. परंतु या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या नशिबी दुर्दैव आले आहे. म्हणून दिवसेंदिवस आपला तरुण वर्ग अधिकाधिक व्यसनी बनत चालला आहे. युवक हा राष्ट्राचा कणा आहे. तो राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. युवाशक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती ही शक्ती कमकुवत न होऊ देणे हे प्रत्येक देशबांधवांचे कर्तव्य आहे. क्षणीक मोहाला बळी पडून व्यसनाधीन होणाऱ्या युवकांची उपेक्षा न करता व त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची विनाशाची वाटचाल थांबवणे हे राष्ट्रीय आद्यकर्तव्य आहे. व्यसनांचे दुष्परिणाम व दूरगामी धोके ओळखले तर कोणताही बुद्धीमान युवक व्यसनास बळी पडणार नाही म्हणूनच आपण सर्वजण हातात हात घालून एक आदर्श व्यसनमुक्त युवाशक्ती उभी करुया !
आपल्या राष्ट्राला सामर्थ्यवान करण्याकरिता व्यसनमुक्त तरुणांनी आपले जीवन निर्दोष व ध्येयवादी बनविण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, आनंदग्राम सेवा प्रतिष्ठान वडापुरी ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधायक ३१ डिसेंबर दारु नको दूध प्या! हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
पुन्हा एकदा आजपासून संकल्प करुया मावा, गुटखा, तंबाखू, दारु, सिगारेट अशा व्यसनांना तिलांजली देऊन आपण या व्यसनातून वाचलेले पैसे अनाथ, गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, वृद्धाश्रमातील अनाथ मातापित्यांसाठी खाऊ पिऊ घालून उद्याचा सशक्त, दमदार व व्यसनमुक्त निरोगी भारत घडवू या, आपणा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
* आपले नम्र *
प्रा. धनंजय शामराव देशमुख
व्यसनमुक्त युवक संघ आणि आर्ट ऑफ लिव्हींग परिवार
श्री. माजिदखान रज्जाक पठाण
रचना देशी गो संवर्धन केंद्र
श्री. प्रशांत भानुदास शिताप
श्री. ईश्वर फलफले तालुकाध्यक्ष, व्यसनमुक्त युवक संघ इंदापूर
B
युवाक्राती प्रतिष्ठान, इंदापूर
सौजन्य :- शहा ब्रदर्स अॅण्ड कंपनी, इंदापूर
* कार्यक्रम पत्रिका *
रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी वेळ :- सायं. ७.०० वा. * अध्यक्ष - मा.सौ. अंकिताताई मुकूंद शहा
मा. नगराध्यक्षा, इंदापूर नगरपालिका
* उद्घाटक *
मा.श्री.
प्रदीपदादा गारटकर मा.श्री. प्रवीण (भैय्या) माने
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा
मा. श्री. भरतशेठ शहा
चेअरमन, इंदापूर अर्बन बँक
मा. श्री. विशाल (दादा) बोंद्रे
शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक मा. श्री. जयंत नायकुडे
जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग कॉलेज
मा. अमर गाडे आणि
मा. गणेश महाजन
अध्यक्ष, श्री.छ. शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा
मा. श्री. प्रताप कदम राजीव प्रताप निसर्गोपचार केंद्र, गलांडवाडी नं. १
--* सन्माननिय उपस्थिती
मा.डॉ. लक्ष्मण आसबे अध्यक्ष, कामधेनु सेवा परिवार बावडा
सोनाई परिवार
मा.श्री. बाबासोो घाडगे सर अध्यक्ष, जेष्ठ नागरीक संघ इंदापूर
मा. श्री. कैलास कदम
नगरसेवक, इंदापूर न.पा. मा. श्री. दशरथबुवा महाडीक अध्यक्ष, गोविंद वृध्दाश्रम, टेंभूर्णी मा. श्री. आझाद पटेल
अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ इंदापूर
मा.सौ. उज्वला गायकवाड
मा. अध्यक्षा, लिनेस क्लब
मा.सौ. जयश्री खबाले
मा. अध्यक्षा, लिनेस क्लब
मा. रज्जाक जब्बार पठाण
रचना देशी गो संवर्धन केंद्र मा.सौ. माधवी सुन्नीस महिला दक्षता कमिटी इंदापूर
मा. सौ. रेश्मा शेख
महिला दक्षता कमिटी इंदापूर
मा.कु. निर्मला जाधव महिला दक्षता कमिटी इंदापूर
मा.कु. निर्मला जाधव
महिला दक्षता कमिटी इंदापूर
मा.प्रा.सौ. जयश्री गटकुळ
अध्यक्षा, जिजामाता इन्स्टिट्युट
मा.सौ. अनिता खरात
महिला दक्षता कमिटी इंदापूर मा. सायराभाभी आत्तार
मा. अध्यक्षा, लिनेस क्लब, इंदापूर मा.सौ. कल्पना भोर मा.सौ. मयुरा मधुकर पाटील राजमाता ग्रुप इंदापूर मा. सौ. निलोफर पठाण
मा. अध्यक्षा, युवाक्रांती प्रतिष्ठान
महिला दक्षता कमिटी इंदापूर
रचना देशी गो संवर्धन केंद्र, लोणी देवकर यांचे तर्फे मसाला दुध वाटप
दि आर्ट ऑफ लिव्हींग, इंदापूर
शिवभक्त परिवार, इंदापूर
रोटरी क्लब ऑफ इंदापूर
पतंजली योग समिती, इंदापूर
लिनेस क्लब, इंदापूर
* विशेष सहकार्य *
युवा क्रांती प्रतिष्ठान, इंदापूर
व्यापारी संघटना, इंदापूर
इंदापूर सायकल क्लब, इंदापूर
इंदापूर तालुका पत्रकार संघ, इंदापूर
राजमाता ग्रुप, इंदापूर
छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, खडकपूरा
माजी सैनिक संघटना, इंदापूर
जेष्ठ नागरी संघ, इंदापूर
श्रीनाथ परिवार, वडापुरी
महिला दक्षता कमिटी, इंदापूर
* स्थळ :- श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपूरा, इंदापूर
मेजर मारुती मारकड
डॉ. श्री. संजय शिंदे, बावडा
श्री. शरद झोळ (सर), इंदापूर
श्री. विजय नवल सर, इंदापूर
श्री. संतोष नरुटे, नरुटवाडी
श्री. अस्लम शेख, इंदापूर
श्री. सुदीप ओहोळ, इंदापूर
श्री
. गणेश कांबळे, इंदापूर
श्री. प्रा. मंडलिक सर, इंदापूर
श्री. केदार रविंद्र कांबळे, इंदापूर
मेजर महादेव सोमवंशी
* संपर्क
मेजर कैलास गवळी
श्री. जावेद मुलाणी, निमगांव केतकी श्री. अमजद मोमीन, इंदापूर
श्री. दत्तात्रय गुजर सर, इंदापूर
श्री. रविंद्र परबत, कुडूवाडी
श्री. डॉ. संतोष नगरे, इंदापूर
श्री. विकास खिलारे, इंदापूर
श्री . तानाजी पांडुळे, बरकुटे
श्री. दशरथ दादा भोंग, इंदापूर
श्री. दत्तात्रय अनपट योगगुरु
श्री. मल्हारी घाडगे योगगुरु
श्री. पियुष बोरा, इंदापूर
श्री. प्रमोद भंडारी, इंदापूर
अॅड. आशुतोष भोसले, इंदापूर
श्री. सचिन परबते, इंदापूर
श्री. रमेश आबा शिंदे, इंदापूर
श्री. बाळासाहेब क्षिरसागर, इंदापूर
श्री. भिमाशंकर जाधव, इंदापूर
श्री. आडकर सर, इंदापूर
मेजर रविराज पवार
श्री. धरमचंद लोढा, इंदापूर
श्री. सचिन पवार, इंदापूर
श्री. एस.बी. टेलर, इंदापूर
श्री. विजय फलफले सर
श्री. अक्षय खरात, इंदापूर
श्री. ज्ञानदेव डोंगरे, इंदापूर
श्री. सागर शेंडुलकर, इंदापूर
श्री. शुभमभैय्या पवार, इंदापूर
श्री. श्री गानबोटे, इंदापूर

