श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील मेनरोडवरील नितीन झेरॉक्स चे संचालक संतोष गायकवाड यांचा ज्येष्ठ चिरंजीव तेजस हा पंढरपूर ते घुमान ( पंजाब) सायकल पालखी यात्रेद्वारे पंजाब च्या घुमान याठिकाणी पोहोचला,तदनंतर पाकिस्तान मधील करतारपूर येथील गुरुद्वारास त्याने भेट दिली.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी दिन आणि सिख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांचा ५५४ वा प्रकाश पर्व जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान ( पंजाब ) असा 'सायकल, पालखी, यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेचा शुभारंभ कार्तिक शुद्ध एकादशी, दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून निघाली.
ही यात्रा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हरयाणा मार्गे पंजाब राज्यातील श्रीक्षेत्र घुमाण अशी २२ दिवसांच्या सुमारे २४०० कि.मी. अशी काढण्यात आली. भागवत धर्म प्रसारक समितीचे वेळापुर येथील अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी काढलेल्या धार्मिक व आध्यात्मिक सायकल वारीत सहभागी भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार समिती (घुमाण) आणि विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने देशभरातील शांतता, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध राज्यातील भाविकांच्या मागणीनुसार पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. २३ नोव्हेंबर पासून हा प्रवास सुरू केला. त्यामध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रातील शासकीय, व्यापारी, सेवानिवृत्त अधिकारी सहभागी झाले होते. त्यामध्ये श्रीरामपूर येथील तेजस संतोष गायकवाड सहभागी झाला. ९ डिसेंबर रोजी चंडीगढचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सर्वांचे स्वागत आणि सत्कार केला. त्याप्रसंगी तेजस गायकवाड यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे आरती आणि माहितीचे हिंदी पुस्तक भेट म्हणून दिले. दोन दिवस पावसात भिजून अथक परिश्रमाने घुमान येथे पोहचल्यानंतर सत्कार समारंभ १२ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर १३ तारखेला लगेच तो करतारपुर पाकिस्तान मध्ये गेला. करतारपुर येथील गुरुद्वारा येथे घुमान येथील संत शिरोमणी नामदेव महाराज यांची फोटो फ्रेम आणि माहितीचे पुस्तक भेट म्हणून दिले. अशी हि आध्यात्मिक, धार्मिक, शांती व समता बंधुता संदेश घेऊन जाणारी वारी तेजस गायकवाड यांनी पुर्ण केली. या कामगिरीबद्दल तेजस याचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

