श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य उद्धवराव पवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम.आर.बी.एन.बी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बडदे सर ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र पवार, शेती विभाग प्रमुख एकनाथराव औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलांना शाळेच्या वतीने स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच मुलांना शालेय अध्ययनाबरोबर कला गुण तसेच बौद्धिक व्यावसायिक ज्ञान उपलब्ध होण्यासाठी शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते.यावेळी मुलांनी विविध प्रकारचे स्टॉल लावत चविष्ट खाद्यपदार्थ लावल्याने अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी खरेदी-विक्री केली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सदरच्या आनंद मेळाव्यातून आनंद व्यक्त करण्यात येत होता प्रसंगी पालक वर्गातून मोठी उपस्थिती व शिक्षक वृंद यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रज्ञा कसार व सौ. शितल निंभोरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री भास्कर सदगीर, बाळासाहेब कसार, श्रीमती स्वेजल रसाळ ,श्रीमती उषा नाईक - बोरावके श्रीमती जिजाबाई थोरात, श्रीमती जयश्री जगताप, सर्वश्री प्रशांत बांडे, अशोक पवार,भास्कर शिंगटे, संदीप जाधव आदि शिक्षक वृंद विद्यार्थी पालक उपस्थित होते. शेवटी आभार श्री.अविनाश लाटे यांनी मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

