पिंपळनेर भारतीय जनता पार्टीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव केला साजरा.
शिर्डी प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीने देशातील तिन राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ़ या राज्यांमध्ये घवघवीत यश प्राप्त करुन भारतीय जनता पार्टीचे तिनही राज्यात सत्ता आणली या यशाबद्दल पिंपळनेर मंडल, पिंपळनेर शहर, व पिंपळनेर मंडल युवा मोर्चाच्यावतीने पिंपळनेर बसस्थानक जवळ फटाके फोडुन व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी,जेष्ठ कार्यकर्ते व महिला भगिनी ,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळनेर मंडल अध्यक्ष, इंजि.विक्की कोकणी.पिंपळनेर शहर अध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे.पिंपळनेर मंडल युवामोर्चा अध्यक्ष, पंकज भावसार यांनी केले होते.

