shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील पालखीचा संगमनेर तालुक्यात अपघात; चार जणांचा मृत्यू

शिर्डीतील पालखीचा संगमनेर तालुक्यात अपघात; चार जणांचा मृत्यू
नगर प्रतिनिधी :(संजय महाजन)

शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक  महामार्गावरील १९ मैल जवळ अपघात झालाय. पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींनवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या
दिंडीत कंटेनर घुसल्याने झालेल्या अपघातात, चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ वारकरी जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील 19 मैल
(खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब
अर्जुन गवळी (मढी बु,ता. कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर, शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे, ता. राहता) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.
अपघातात तीन वारकऱ्याचा मृत्यू : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज
मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या ३६ वर्षांना पासून आयोजित करतात. यंदाच्या ३७ वे वर्ष आहे या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात २५० ते ३०० वारकरी सहभागी झाले होते. ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावरील १९ मैल येथे पोहचली असतांना अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला MH१२ VT १४५५ नंबरचा कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच तर दोन वारकऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय, तर नऊ वारकरी जखमी असून जखमींना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

कंटेनर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात: ही दुर्दैवी घटना आज रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनर चालक नशेत असल्याने त्याला डुलकी लागल्याचे समजते. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची ओळख पटली असून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना मदत करत दिलासा दिला आहे.
close